चंदीगढ: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकायला जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाल्याचा आरोप पंजाब भाजपकडून करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांना संबोधित केले होते. या कार्यक्रमासाठी जमलेल्या भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांवर लाठीजार्ज झाल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि राज्सभा खासदार दुष्यंत कुमार गौतम यांनी केला आहे.(BJP Secretary Dushyant Kumar accused Punjab Govt beat BJP Workers)
“पंजाब सरकारने केलेल्या कारवाईत आमच्या पक्षाचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून एका कार्यकर्त्याला 22 ते 23 टाके पडलेत”,असा दावा दुष्यंत कुमार गौतम यांनी केला. पंजाब पोलिसांनी बळाचा वापर करुन शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही गौतम यांनी केला. शेतकऱ्यांनी घातलेला मंडप देखील हटवण्यात आला, असं भाजपच्या खासदारांनी सांगितलं आहे.
“दिल्लीच्या सीमांवर बसलेले आमच्यावर काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकार काम करत असल्याचा आरोप करतात.” मात्र, सोशल मिडीयावर काँग्रेस नेत्यांचे फोटो त्यांच्यासोबत पाहायला मिळतील, असं म्हटलं आहे.
शेतकरी आंदोलनातील डाव्या शक्ती आंदोलनावर मार्ग निघून देत नाहीत, असा आरोप दुष्यंत कुमार गौतम यांनी केला. मोदी सरकारने शेतकऱ्यांसोबत सलग पाच ते सहा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये सरकारनं शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली आहे. सरकारने शेतकऱ्यांना कायद्यात दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, शेतकरीचं सरकारच्या भूमिकेवर आरोप करतायत, असं दुष्यंत कुमार गौतम यांनी म्हटलं आहे.
राजकीय स्वार्थ साधण्याचा विरोधकांचा डाव
शेतकऱ्यांना भडकावून राजकीय स्वार्थ साधण्याचा विरोधकांचा डाव आहे. आपल्या स्वार्थी राजकारणासाठी विरोधक लुडबुड करत आहेत. देशातील शेतकरी विरोधकांची ही चाल जाणून आहे. शेतकरी अशा लोकांना थारा देणार नाही, असं सांगतानाच शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका, त्यांना संभ्रमित करू नका, निर्दोष शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळू नका, असं आवाहनही त्यांनी विरोधकांना केलं. आपल्या देशातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड सामर्थ्य असूनही केवळ याच लोकांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा विकास होऊ शकला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. पीएम किसान योजनेचा देशातील सर्वच राज्यांनी लाभ घेतला आहे. पण पश्चिम बंगाल सरकारने त्याचा लाभ घेतला नाही. ममता बॅनर्जी यांनी शेतकऱ्यांची अडवणूक केली. ममता बॅनर्जी यांनी शेतकऱ्यांची योजना रोखून शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवलं आहे. केवळ राजकीय स्वार्थासाटी हे चाललं आहे, अशी टीका मोदींनी केली.
संबंधित बातम्या:
बंगालला उद्ध्वस्त करणाऱ्या विचारधारेचे लोकच दिल्लीत आंदोलन करतायत; मोदींचा निशाणा
(BJP Secretary Dushyant Kumar accused Punjab Govt beat BJP Workers)