नवी दिल्लीः श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘जिहाद’ (Jihad)शिकवला, त्याच बरोबर ‘जिहाद’ ही संकल्पना फक्त कुराणमधूनच आली नाही तर, भगवदगीता आणि कुराणमधून तर आली आहेच. तर या धर्माबरोबरच ख्रिश्चन धर्मानेही ‘जिहाद’ सांगितला आहे. असं वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील (Former Minister Shivraj Patil)यांनी केले आणि त्याच्यावर आता जोरदार हंगामा सुरु झाला आहे. माजी केंद्रीय मंत्री मोहसिनी किदवाई यांच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजपच्या (BJP) हातात आयतेच कोलीत मिळाले.
यावरुनच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवराज पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची टीका केली आहे.
शिवराज पाटील यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधान आले असतानाच अतुल भातखळकर यांनी ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुस्लिम मतदार डोळ्यासमोर काँग्रेस अजून किती खाली घसरणार आहे.
ज्या काँग्रेसनी रामाच्या अस्तित्वाला नाकारले, राहुल गांधींनी हिंदू दहशतवादसारख्या शब्दांचा वापर केला. टुकडे टुकडे गँगचे काँग्रेसने समर्थन केले त्या काँग्रेसकडून यापेक्षा दुसरी काय अपेक्षा करणार असा हल्लाबोल त्यांनी काँग्रेसवर आणि त्यांच्या नेत्यांवर केला आहे.
माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांनी काल जिहादवर बोलल्यानंतर आणि त्याच्यावरुन वाद उफाळून आल्यानंतर त्यांनी पलटी मारली आहे. ते म्हणाले की, माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढून माध्ममांनीच माझ्या वाक्याची मोडतोड करुन दाखवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, श्रीकृष्णानी अर्जुनला कर्तव्याचे, कर्तृत्वाचे पाठ शिकवले, त्यांना तुम्ही जिहाद म्हणाल का असा प्रतिसवालही त्यांनी केला आहे. माध्यमांनी मी बोललेल्या माझ्या वाक्यातील काही शब्द वगळून ते प्रसिद्ध केल्याचेही सांगितेल.
शिवराज पाटील यांनी जिहादविषयी काय बोलले होते, ते त्यांचे विधान जाणून घेतल्यावरच त्यातील गोष्टी समजू येतात. जिहाद विषयी शिवराज पाटील म्हणता की, इस्लाममधील जिहादची खूप चर्चा केली जाते, जर त्याचा हेतू बरोबर असेल. किंवा त्यातून कोणतेही चांगले काम करायचे असेल तर सत्तेचा वापर करणे योग्यच आहे.
अशी संकल्पना त्यांनी मांडली आहे. तर ही गोष्ट फक्त कुरानमध्येच सांगितली नाही तर महाभारतातील गीतेतील प्रसंगामध्येही आणि खिश्चन धर्मातही अशाच प्रकारे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला असंही ते म्हणाले.
शिवराज पाटील आणि त्यांनी वक्तव्य केलेल्या वाक्यावरुन वाद निर्माण का झाला आहे. तर त्याचे मूळ कारण आहे. त्यांनी सांगितलेल्या दोन्ही गोष्टी या एकाच चष्मातून बघितल्या जात आहेत.
तर शिवराज पाटील यांनी श्रीकृष्णाने दिलेले धडे, आणि त्याच्या या शिकवणीची तुलना जिहादबरोबर असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे श्रीकृष्णाने न्याय आणि सत्ता स्थापन करण्यासाठी शक्तीचा उपयोग योग्य असल्याचे म्हटले आहे. हे जरी खरं असलं तरी वर वर पाहता शिवराज पाटील यांनी सांगितलेली ही गोष्टी सहज आणि साध्यही नाही
कुराणाचा आधार घेऊन जिहादचा अर्थ सांगायचा झाला तर त्याचा अर्थ होता प्रयत्न. त्याच्या खोलात आणि दीर्घ अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा अर्थ होतो की, वाईट गोष्टींना दूर करण्याचा प्रयत्न.
त्याही पुढे जाऊन तुम्ही त्याचा व्यापकपणे अर्थ समजून घेतला तर जिहादचा अर्थ होतो की, जरा व्यापक अर्थाने समजून घ्यायचे असेल तर जिहादचा अर्थ न्याय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणे असा होतो. त्याची व्याप्ती आणखी वाढवली तर जिहाद म्हणजे न्याय मिळण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करणे.
इथे सत्तेच्या वापराचा मुद्दाही समोर येतो. सोव्हिएत युनियनविरुद्ध मुजाहिदीनचा जिहाद आणि ‘क्रूसेडर’ अमेरिकेविरुद्ध ओसामा बिन लादेनचा जिहाद इथे येतो. यानंतर जिहादचा खरा अर्थ संपतो आणि हा शब्द दहशतवादाशी जोडला जातो.