चेन्नई : महापालिकेचा (Chennai Municipal Corporation) निकाल लागला आहे. या निवडणुकीमध्ये 200 जागांपैकी केवळ एक जागा भाजपाच्या (BJP) वाट्याला आली. वार्ड क्रमांक 134 पश्चिम मम्बलममधून भाजपाच्या उमेदवार उमा आनंदन (Uma Anandan)या विजयी झाल्या आहेत. मात्र उमा आनंद विजयी होताच आता त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उमा आनंदन यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याची स्तुती केली होती. तसेच अन्य एका व्हिडीओमध्ये त्यांनी जाती व्यवस्थेचे समर्थन केले होते. तसेच त्या दलीत नेत्यांविरोधात देखील अपमानकारक टीपणी करताना दिसून येत आहेत. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मंगळवारी त्यांचे हे सर्व व्हीडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या वादात सापडल्या आहेत.
मंगळवारी चेन्नई महापालिकेचा निकाल लागला. 200 जागांपैकी भजापाच्या वाट्याला केवळ एकच जागा आली. उमा आनंदन या विजयी झाल्या. मात्र त्यानंतर अनेकांनी उमा यांच्या जुन्या मुलाखतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. हे सर्वच व्हिडीओ वादग्रस्त असून, त्यातील एका व्हिडीओमध्ये त्यांनी नथुराम गोडसे याची स्तुती केली आहे. तसेच अन्य एका व्हिडीओमध्ये त्या मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मियांबद्दल अपमानकारक बोलल्या आहेत. आता हे सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडीओमुळे उमा आनंदन या वादात सापडल्या आहेत.
त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर झाला आहे. ज्या व्हिडीओमध्ये त्या म्हणत आहेत की, मला मी ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो, मला जातीचा उन्माद नाही. परंतु मला मी ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो. जातीमुळे संस्कृती टीकून आहे. जात संपली तर संस्कृती उरणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्या या व्हिडीओमध्ये द्रमुकबद्दल अपमानकारक टीपनी करताना दिसून येत आहेत.
“I am a proud supporter of Godse, a Hindu, who killed #Gandhi quite late. Had the killer been someone else, #Gandhi could have been killed even earlier” – Lone BJP councillor Uma Anandan who won the ward 134 of #Chennai Corporation in the #TamilNadu #UrbanLocalBodyElection2022. https://t.co/yt0xrTmEGa pic.twitter.com/Pf4i5Pob9D
— சிலம்பரசன் (@chilamb_arasan) February 22, 2022
P C Sorcar: ब्रिटनलाही घामटा फोडणारा महान जादूगार ‘पीसी सरकार’
नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर डिबेट करायचीय, इमरान खान यांचा नेमका प्लॅन काय?