नवी दिल्लीः दिल्लीतील मद्यघोटाळा आपच्या (AAP)अंगलट येण्याच्या मार्गावर असल्याचे भाजपकडून (BJP)बोलले जात आहे. या मद्य घोटाळ्यावर आपकडून स्टिंग ऑपरेशन (Sting operation) केल्याच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. भाजपचे प्रवक्त सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले आहे की, मद्य घोटाळ्यातील अमित अरोरा हा या घोटाळ्यातील आरोपी आहे. त्याने कोणा-कोणाकडून पैसे घेतले आहेत आणि हा घोटाळा कशा प्रकारचा झाला आहे हेही त्याने सांगितले आहे.
या सगळ्या गोष्टींचा खुलासा त्याच्याकडून केला गेला असून सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले की, दिल्लीत जे मद्य धोरण राबवण्यात आले ते सगळे घोटाळा करण्यासाठीच त्याचा वापर केला गेला असल्याची टीका त्यांनी केली आहे.
दिल्लीतील आपचा मद्य घोटाळा उघड झाल्यानंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले की, जे स्टिंग ऑपरेशन केले गेले आहे, त्यामध्ये सरकारचे कमिशन ठरलेले असल्याचे उघड झाले आहे.
एवढेच नाही तर मद्य घोटाळ्यातील हा सगळा पैसा गोवा आणि पंजाब राज्यातील निवडणुकांसाठी वापरला गेला असल्याची टीकाही केली जात आहे.
भाजपच्या प्रवक्त्यानी या घोटाळ्याविषयी बोलतान सांगितले की, कमीत कमी 5-5 कोटींची रक्कम आपकडून ठरवण्यात आली होती. आपकडून ही 5 कोटींची रक्कम एवढ्यासाठीच ठेवण्यात आली आहे की, यामध्ये कोणत्याही छोट्या व्यापऱ्यांनी सहभाग घेऊ नये फक्त मोठ्या व्यापऱ्यांनीच यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी ही योजना राबवण्यात आली होती.
डायरेक्ट कॅश कलेक्शन हा दिल्ली सरकारचा हा एक नवा प्रकार आता लोकांसमोर आला आहे. दिल्लीत जो मद्य घोटाळा झाला आहे, तो डायरेक्ट कॅश कलेक्शनमधूनच झाला असल्याचेही भाजपकडून सांगितले जात आहे.
दिल्ली सरकारचा मद्य घोटाळा भाजपकडून उघड करण्यात आल्यानंतर 5 सप्टेंबर रोजी स्टिंग ऑपरेशनचा एका व्हिडीओ सगळ्यांसमोर आणला गेला. त्या व्हिडीओमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला की, त्यामध्ये आरोपीचे वडील दारुचा परवाना काढण्यासाठी त्यानी कमिशन दिले होते.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र संबित पात्रा यांनी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यावर टीका करताना त्यांनी नव्या उत्पादन शुल्काच्या धोरणाबाबत पाच सवाल उपस्थित केले होते.
त्याची उत्तरं अजूनही आपकडून देण्यात आली नसल्याचे सांगत, आपचे हे दुसरे स्टिंग केले गेले आहे त्यातून त्यांची पोलखोल होणार असल्याची टाकी केली गेली आहे.