मुंबई : देशात गेल्या तीन-चार दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. त्यातच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी (Black Fungus Mucormycosis) या आजाराने देशासह राज्यात शिरकाव केलाय. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 1 हजार 500 पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील या आजाराबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत. तसेच या आजारापासून संरक्षण व्हावं, यासाठी काही उपायदेखील सुचवले आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काळ्या बुरशीची लक्षणे लवकर ओळखून त्यापासून स्वतःचं संरक्षण करा, असा सल्ला नागरिकांना दिला आहे. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, जागरूकता आणि सुरुवातीलाच लक्षणे ओळखून काळ्या बुरशीचा धोका टाळता येतो. (Black Fungus Mucormycosis cases increasing, Govt Shares Symptoms and 8 ways of prevention)
म्युकरमायकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे, जे कोरोना विषाणूमुळे उद्भवते. हा संसर्ग सामान्यत: नाकातून सुरू होतो. जे हळूहळू डोळ्यांपर्यंत पसरतो. म्हणूनच, संक्रमण होताच त्यावर उपचार करणे फार महत्वाचे आहे.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्णांमध्ये केवळ काही विशिष्ट परिस्थितीत म्युकरमायकोसिस होण्याचा धोका वाढतो. अनियंत्रित मधुमेह, स्टिरॉइड्समुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, दीर्घकाळ आयसीयू किंवा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट राहणे, इतर कोणताही रोग, पोस्ट प्रत्यारोपण (ऑर्गेन ट्रान्सप्लांट) किंवा कर्करोग झाल्यास काळ्या बुरशीचा धोका वाढू शकतो.
काळ्या बुरशीमध्ये बर्याच प्रकारची लक्षणे दिसतात. डोळे लाल होणं किंवा डोळे आणि आसपास वेदना होणे, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेताना त्रास होणे, उलट्या होणे आणि त्यावाटे रक्त पडणं किंवा मानसिक स्थितीत बदल होणे ही काळ्या बुरशीची प्रमुख लक्षणे आहेत.
काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी धुळीच्या ठिकाणी मास्क घाला. माती किंवा खत यांसारख्या गोष्टींच्या संपर्कात येत असाल तर शूज, ग्लोव्हज, फुल स्लीव्ह शर्ट आणि ट्राऊझर घाला. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. मधुमेहावर नियंत्रण मिळवा, इम्यूनोमोड्युलेटिंग औषधे किंवा स्टिरॉइड्सचा वापर टाळा
तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवा. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच स्टिरॉइड्स वापरा. ऑक्सिजन थेरपीच्या वेळी, ह्यूमिडिटीफायरसाठी फक्त स्वच्छ पाणी वापरा. आवश्यकतेनुसार अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधे वापरली पाहिजेत.
#Mucormycosis, commonly known as ‘#BlackFungus‘ has been observed in a number of #COVID19 patients recently.
Awareness & early diagnosis can help curb the spread of the fungal infection. Here’s how to detect & manage it #IndiaFightsCorona @MoHFW_INDIA pic.twitter.com/lC6iSNOxGF
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) May 14, 2021
काळ्या बुरशीपासून संरक्षणासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तिच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. नाक बंद असेल तर सायनस किंवा तत्सम सर्दीसारखा आजार आहे, असं समजण्याची चूक करु नका. खास करुन कोविड-19 आणि इम्यूनोसप्रेशनमध्ये अशी चूक करु नका.
महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातही म्युकरमायकोसिसची प्रकरणे आढळून येत आहेत. सध्या गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड आणि राजस्थानमध्ये काळ्या बुरशीचे प्रकार दिसून आले आहेत. यामुळे रुग्णाच्या डोळ्याला, नाकातील हाडांना आणि जबड्यालाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते. त्यामुळेच वेळेवर उपचार करणे महत्वाचे आहे.
इतर बातम्या
घरोघरी जाऊन कोरोनाच्या चाचण्या करा; मोदींचे उच्चस्तरीय बैठकीत आदेश
भारतात घाई-गडबड नको, अमेरिकेप्रमाणे मास्क हटवण्याचा निर्णय तूर्तास नाही : AIIMS
(Black Fungus Mucormycosis cases increasing, Govt Shares Symptoms and 8 ways of prevention)