Eknath Shinde : 75 दिवसांमध्ये राज्यभरातील नागरिकांना मिळणार बुस्टर डोस, देशव्यापी मोहिमेत राज्याचा सहभाग

| Updated on: Jul 14, 2022 | 1:52 PM

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत आहे. पण सक्रीय रुग्णांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने आता बुस्टर डोस हा प्रभावी ठरणार आहे. शिवाय हा डोस मोफत असणार आहे. यापूर्वी कोरोना लस देखील मोफत देण्यात आली होती. कोरोनामुक्त देश हा यामागचा उद्देश असून बुस्टर डोससाठी यंत्रणा लागलीच कार्यन्वित केली जाणार आहे.

Eknath Shinde : 75 दिवसांमध्ये राज्यभरातील नागरिकांना मिळणार बुस्टर डोस, देशव्यापी मोहिमेत राज्याचा सहभाग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : (Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच (Central Government) केंद्र सरकारने आता (Booster Dose) बुस्टर डोस प्रत्येक नागरिकाला मिळावा यासाठी देशव्यापी मोहिम राबविण्याचे ठरवले आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही सहभाग राहणार असून आगामी 75 दिवसांमध्ये राज्यातील 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना हा डोस दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनांनतर याची अंमलबजावणी आता राज्यात केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंत्रिमंडळातील विविध महत्वाच्या विषयावर चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभर आता बुस्टरडोससाठी आरोग्य यंत्रणा राबणार आहे.

पंतप्रधानांचा फोन अन् अंमलबजावणी

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा शिवाय भविष्यात त्याच्यामध्ये वाढ होऊ नये यासाठी बुस्टर डोस हा महत्वाचा आहे. त्यामुले केंद्र स्तरावर बुस्टर डोस देण्यासंदर्भातील मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याच अनुशंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. राज्यात पुढील 75 दिवसांमध्ये बुस्टर डोससाठी यंत्रणा सज्ज राहणार आहे. 18 वर्षापासून ते 59 वयोवर्षापर्यंतच्या नागरिकांना हा डोस दिला जाणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत आहे. पण सक्रीय रुग्णांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने आता बुस्टर डोस हा प्रभावी ठरणार आहे. शिवाय हा डोस मोफत असणार आहे. यापूर्वी कोरोना लस देखील मोफत देण्यात आली होती. कोरोनामुक्त देश हा यामागचा उद्देश असून बुस्टर डोससाठी यंत्रणा लागलीच कार्यन्वित केली जाणार आहे. स्थानिक पातळीपासून ते मेट्रो शहरापर्यंत कसे नियोजन होईल यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

आरोग्य यंत्रणांना सूचना

राज्यात बुस्टर डोस प्रत्येक नागरिकाला मिळावा यासाठी आता आरोग्य यंत्रणा सतर्क राहाणार आहे. तशा सूचना ह्या सचिवांना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. ज्याप्रमाणे कोरोना लस देण्याासाठी यंत्रणा सक्रीय झाली होती अगदी त्याचप्रमाणे आता बुस्टर डोसही कमी कालावधीमध्ये अधिक नागरिकांना कसा मिळेल यावर भर राहणार आहे. याचे नियोजन लागलीच केले जाणार असून 75 दिवसांमध्ये सर्व राज्यातील नागरिकांना हा डोस देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे.