गुजरात : पाकिस्तानी बोट (Pakistani Boats) भारतीय समुद्री हद्दीत घुसल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी बीएसएफनं कारवाईही (BSF) केली. भुजमधील हरामी नाला (Harami Nala, Bhuj, Gujrat) भागातून एका पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेण्यात आलं. समुद्री सीमेवर स्तंभ क्रमांक 1160 जवळ भारतीय सीमेत जवळपास 100 मीटर आतमध्ये ही नाव पकडण्यात आली असल्याची बीएसएफनं दिली आहे. 3 एप्रिल रोजी गुजरातमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या बोटीवर कारवाई केली. मासेमारी करणारी ही बोट असून या बोटीमध्ये मासे साठवण्याचं सामानही आढळून आलं आहे. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. घातपाताच्या हेतून ही बोट आली होती की वाट चुकून या बोटीनं भारतीय हद्दीत प्रवेश केला, याचाही सखोल तपास यंत्रणांकडून केला जातो आहे.
रविवारी 3 एप्रिल रोजी बीएसएफ जवानांकडून नियमित पेट्रोलिंग केलं जात होतं. यावेळी एक अज्ञात बोट जवानांच्या निदर्शनास आली. या बोटीबाबत संशय आल्यानं बीएसएफ जवानांनी या बोटीच्या दिशेनं मोर्चा वळवला.
जप्त करण्यात आलेली बोट पाकिस्तानातील असल्याची माहिती बीएसएफकडून देण्यात आली आहे. ही एक मच्छिमार बोट होती. भारताच्या 100 मीटर आतपर्यंत ही बोट आल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातच्या भुजमधील हरामी नाला परिसरातून या बोटीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
बोट ताब्यात घेण्यात आल्यानंतर या बोटीचा कसून तपास करण्यात आलं. एखादी संशयास्पद वस्तू बोटीत आहे का, या अनुशंगानंही यावेळी तपास करण्यात. मात्र कोणतीही शंकास्पद वस्तू या बोटींमध्ये आढळून आलेली नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.
Border Security Force on Sunday evening, April 3, seized one Pakistani fishing boat approximately 100 meters inside Indian territory near border pillar no. 1160 in Harami Nala area in Gujarat’s Bhuj, says BSF pic.twitter.com/9sbQvWJUs3
— ANI (@ANI) April 4, 2022
भारतीय हद्दीच्या 1160 नंबर पिलरपासून आतपर्यंत ही बोट आलेली होती. या बोटीमध्ये काही मासेमारही असल्याची माहिती समोर आली आहे. बीएसएफ जवानांनी दलदलीचा परिसर आणि अंतर पार कर या बोटीपर्यंत पोहोचून कारवाई केली आहे. रविवारी रात्री 8.30 वाजता ही कारवाई करण्यात आल्याची माहिती बीएसएफकडून देण्यात आली आहे.
फेब्रुवारीतही तब्बल 18 पाकिस्तानी बोटींवर याच ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळीही बीएसएफनं 18 पाकिस्तानी बोटी जप्त केल्या होत्या. बीएसएफच्या क्रीक क्रोकोडाईल कमांडो पथकानं भारतीय हवाई दलाच्या मदतीनं ही कारवाई केली होती. यावेळी सहा पाकिस्तानी मासेकमाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा 3 एप्रिलला बोटींवर कारवाई करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात बैठक; शेजारच्या वर्तमान परिस्थितीवर काथ्याकूट
हिजाब परिधान करणाऱ्यांची परीक्षेच्या कामांपासून मुक्तता, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
मोठी घोषणा, एचडीएफसी आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणास मान्यता, काय होणार परिणाम?