मुंबई – “पण मी दौरा करीत राहणार आहे. पाच तारखेचं राज ठाकरेंनी (Raj Thackeray) इतकं मोठं आवाहन केलं होतं, पुर्ण देशातून इथं यायला लोक तयार होती. आम्ही पाच तारखेला सरजूमध्ये स्थान करणार असं जाहीर केल होतं. आता हे प्रकरण बदललं आहे. या कारणामुळे अतिशय आनंदात वैदीत पध्दतीने साधू संतांच्यामध्ये योगीजींचा (Yogi Adityanath) पाच तारखेला वाढदिवस साजरा आयोध्येत साजरा करू असं त्यांनी बृजभूषण सिंग यांनी सांगितलं आहे. त्यामुळे काही झालं तरी आमच्या पाच तारखेपर्यंत सभा सुरु राहणार आहेत. आज बृजभूषण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांची गोंढामध्ये जाहीर सभा देखील होणार आहे.
राज ठाकरेंनी जरी आपला दौरा रद्द केला तरी मी माझ काम सुरु ठेवणार
बृजभूषण सिंग हे आज दौऱ्यावर आहोत. राज ठाकरेंनी जरी आपला दौरा रद्द केला तरी मी माझ काम सुरु ठेवणार आहे. तसेच माझ्या पाच तारखेपर्यंत ठरलेल्या सभा नियोजित वेळेत होणार आहे. पाच तारखेला युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा साधू संतांच्या उपस्थित मोठा वाढदिवस साजरा करू असं देखील त्यांनी सांगितलं आहे. बृजभूषण सिंग यांच्या सभेदरम्यान लागलेल्या बॅनरची अधिक चर्चा होती. सोशल मीडियावर अधिक बॅनर व्हायरल झाले आहेत.
इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हाही हिंदू-मुस्लीम एकत्र आले
सगळ्यांना काम करण्याचा हक्क, संविधान सांगतं, भाषेच्या, रंगाच्या, जातीच्या, धर्माच्या आधारावर तुम्ही कुणाशी भेद नाही करु शकत. समोर अयोध्या, पहिल्यांदा ही अशी लढाई आहे, जी सत्ता मिळवण्यासाठी नाही तर अन्यायाच्याविरोधात आणि स्वाभीमानासाठी लढली जाते. स्वातंत्र्यावेळी अशी वेळ होती ज्यावेळी हिंदू मुस्लीम एकत्र बसून लढाई लढत होते. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हाही हिंदू-मुस्लीम एकत्र आले. मात्र 45 वर्षांनंतर एक असं आंदोलन तुमच्याकडून छेडलं गेलं, मी हा संकल्प तुमच्या चेहऱ्याकडे पाहून घेतला होता.
5 लाखांचा संकल्प मी हेच पाहून घेतला होता, गोंडा किती देईल, कटरा किती देईल, यावर मी सगळा निर्णय घेतला होता.