नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपानंतर आता अयोध्येतील संत समाज आणि प्रशासन आमने-सामने आले आहेत. भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या समर्थनार्थ राम कथा पार्कमध्ये 5 जून रोजीच्या प्रस्तावित कार्यक्रमाला प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आतासंत समाज आता कार्यक्रम पुढे ढकलणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. लक्ष्मण किलाधीश महंत, मैथिली रमण शरण यांनी सांगितले की, कार्यक्रम आधीच ठरलेला आहे. सर्व व्यवस्था करण्यात येत आहे.
त्यामुळे या अशा परिस्थितीत हा कार्यक्रम पुढे ढकलणे कोणत्याही परिस्थितीत अन्यायकारक होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आम्ही आमचा कार्यक्रम शांततेत पार पाडू. त्यामुळे आता जिल्ह्यालाही माहिती पाठवण्यात आली आहे. यावेळी महंत गौरीशंकर दास यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत संघर्ष होणार नसल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाकडूनही त्यांनी विनंती केली आहे.
निवासी दंडाधिकारी संदीप कुमार यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र एसपी सिटी एमके सिंह यांनी सांगितले की, त्यांच्यासमोर अद्याप एकही अर्ज आलेला नाही.
त्यामुळे काहीही झाले तरी सायंकाळपर्यंत याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे. खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या समर्थनार्थ अयोध्येतील अनेक मंदिरांचे महंत सोमवारी त्यांच्या घरी राहण्याचे त्यांनी ठरवले.
यावेळी येथील लोकांनीही सांगितले की, पॉक्सो कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे. यावर आळा घालण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन कायद्याबाबत आवश्यक त्या सुधारणा करण्याचीही मागणी करण्यात आली होती.