व्यावसायिक धावपटूलाही लाजवेल असं कर्तृत्व, 11 तासांत 180 किलोमीटर धावत शहिदांना सलामी

| Updated on: Dec 14, 2020 | 11:32 PM

धावपटूलाही लाजवेल अशी धाव घेत बीएसएफच्या जवानांनी 1971 च्या युद्धातील वीर जवानांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. (BSF personnel relay race)

व्यावसायिक धावपटूलाही लाजवेल असं कर्तृत्व, 11 तासांत 180 किलोमीटर धावत शहिदांना सलामी
Follow us on

जयपूर : प्रशिक्षण घेऊन तरबेज झालेल्या एखाद्या धावपटूलाही लाजवेल अशी धाव घेत बीएसएफच्या जवानांनी (BSF personnel) 1971 च्या युद्धातील वीर जवानांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. यावेळी जवानांनी अवघ्या 11 तसांत तब्बल 180 किलोमीटर धाव घेत वीरांना अभिवादन केलं. त्यासाठी बिकानेर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने रिले रेसचे आयोजन केले होते.  ( BSF personnel ran a 180 kilometres relay race to honour the 1971 war veterans)

बीएसएफतर्फे 13 आणि 14 डिसेंबर या दोन दिवशी रिले रेसचे आयोजन केले होते. बीएसएफच्या जवानांनी या दोन्ही दिवशी बिकानेर ते अनुपगड या आंतरराष्ट्रीय सीमेवर मध्यरात्री धाव घेतली. जवानांनी 11 तासांत तब्बल 180 किलोमिटरचे अंतर पार केले. या रिले रेसद्वारे 1971 साली शहीद झालेल्या तसेच, मोठी कामगिरी बजावलेल्या वीरांना नमन करण्यात आले. त्यांना सलामी देण्यात आली.

1971 च्या युद्धाची पार्श्वभूमी

1947 साली भारताची फाळणी झाल्यांनतर पाकिस्तानची निर्मिती झाली. स्वातंत्र्योत्तर काळानंतर पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान अशा दोन भागांमध्ये पाकिस्तान ओळखला जायचा. साठच्या दशकात पूर्व पाकिस्तानमधील नेते शेख मुजिबूर रहेमान हे पूर्व पाकिस्तानला स्वयत्तता मिळावी यासाठी झगडत होते. याच मुद्यावरुन पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये संर्घष चिखळत गेला. आणि भारत-पाक युद्धाची बिजं याच संघर्षातून पेरली गेली. (BSF personnel ran a 180 kilometres relay race to honour the 1971 war veterans)

1971 भारत-पाक युद्ध

आपल्या शेजारील राष्ट्र म्हणजेच पाकिस्तानसोबत भारताचे 1971 साली युद्ध (Bharat Pakistan war) झाले. यावेळी भारतीय जवानांनी आपले प्राण तळहातावर ठेवत शत्रूंशी दोन हात केले. या युद्धात भारतीय जवानांनी पाकिस्तानी फौजांचा मुकाबला करत त्यांना जेरीस आणले. अखेर पाकिस्तानी सैन्याने 16 डिसेंबर 1971 रोजी भारतासमोर शरणागती पत्करली. भारत हे युद्ध जिंकला. 16 डिसेंबर 1976 रोजी पाकिस्तानी सेनेने पराभव स्वीकारत अधिकृतपणे युद्ध हारल्याचे मान्य केले. त्यामुळे 16 डिसेंबर हा दिवस आपण विजय दिवस दिन म्हणून साजरा करतो.  याच विजयाची आठवण म्हणून बीएसतर्फे रिले रेसचे आयोजन करण्यात आले होते.


संबंधित बातम्या :

“बजरंग दलावर कारवाई करण्यास फेसबुक घाबरलं, कर्मचाऱ्यांवर हल्ला होईल म्हणून नमती भूमिका”

बायडन आता फक्त एक पाऊल दूर !

अमेरिकेत आजपासून नागरिकांना मिळणार फायझर लस, पहिल्या फेरीत 30 लाख डोस

(BSF personnel ran a 180 kilometres relay race to honour the 1971 war veterans)