पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारचा अर्थसंकल्प 2024 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मंगळवारी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. देशातील 80 कोटी जनतेला रेशनवरील धान्य आणखी पाच वर्षे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच मोबाईल आणि चार्जरवरील कर कमी केल्याने मोबाईल आणि चार्जर स्वस्त होणार आहेत. स्मार्टफोन आणि चार्जरवरील कस्टम ड्यूटी कमी करीत 15 टक्के केली आहे. त्यामुळे मोबाईल फोन आणि चार्जर घेणाऱ्यांना ते आणखीन स्वस्त मिळणार आहेत.
या आधी मोबाईल आणि चार्जर फोनवरील सीमाशुल्क 20 टक्के होते. भारतात गेल्या सहा वर्षांत मोबाईलचे प्रोडक्शन वाढले आहे. मोबाईलच्या निर्मितीत तीन टक्के वाढ झाली आहे. परंतू आजही मोबाईल फोनचे सर्वात मोठे मार्केट चीन असून तेथून बहुतांश मोबाईल फोन आयात केले जात आहेत. त्यामुळे सीमाशुल्कात कपात केल्याने मोबाईल आयात करणे स्वस्त झाले असल्याने मोबाईल फोनच्या किंमती कमी होणार आहेत. केवळ मोबाईल हॅंडसेट आणि चार्जरच नाही तर मोबाईल PCBA वर देखील ( BCD ) बेसिक कस्टम ड्यूटी घटवून 15 टक्के करण्यात आली आहे.
यंदाच्या जानेवारी 2024 मध्ये केंद्र सरकारने मोबाइल फोन निर्मितीसंदर्भातील पार्टसवर देखील आयात शुल्क घटवून 15 टक्क्यांवरुन 10 टक्के केले होते. दुसऱ्या देशातून डिव्हाईस किंवा कंपोनंट्स आयात केल्यानंतर मोबाइल फोन तार करणाऱ्यांना कंपन्यांना बेसिक कस्टम ड्यूटीचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे.
आधी मोबाईलचे पार्ट परदेशातून आयात करताना कंपन्यांना जास्त टॅक्स भरावा लागत होता. त्यामुळे मोबाईल फोनची किंमती वाढल्या होत्या. कस्टम ड्यूटी कमी करण्याचा फायदा घेतल्याने कंपन्यांना आता कमी टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे मोबाईल फोनची किंमती कमी होणार आहेत. त्यामुळे मोबाईल फोन घेणाऱ्यांना या करकपातीचा फायदा होणार आहे.