नवी दिल्ली : दिल्लीच्या शाहीन बाग परिसरातील अतिक्रमण हटवण्यास (Bulldozer in Shaheen Bagh) थोड्याचवेळात सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी शाहीन बाग (Shaheen Bagh) परिसरात हाय होलटेज ड्रामा पहायला मिळत आहे. शाहीन बागमधील अतिक्रमण हटवण्यास स्थानिकांनी विरोध केला असून, काही स्थानिक नेते आणि नागरिक एमसीडीच्या बुलडोजर (Bulldozer) समोर आडवे झाले आहेत. एवढेच नाही तर हे नागरिक एमसीडी आणि भाजपाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करत आहेत. अतिक्रमण हटवण्यास स्थानिक नागरिकांकडून होणारा वाढता विरोध पहाता घटनास्थळी पोलिसांची अतिरिक्त कुमक देखील मागवण्यात आली आहे. जे नागरिक बुलडोजर समोर आले होते, त्यांना तेथून हटवण्यात आले असून, बुलडोजर अतिक्रमण हटवण्यासाठी पुढे पाठवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर ज्या महिलांनी अतिक्रमण हटवण्यासाठी विरोध केला, त्या महिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी भाजप आणि एमसीडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहीन बाग परिसरातील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. हे अतिक्रमण हटवण्यासाठी एमसीडीचे बुलडोजर घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र स्थानिकांनी अतिक्रम हटवणयास विरोध केला असून, काही नेते स्थानिक नागरिकांसह घटनास्थळी पोहोचल्याने गोंधळ वाढला आहे. स्थानिक महिला अतिक्रम हटवण्यासाठी आलेल्या बुलडोजरला अडव्या झाल्या. स्थानिकांचा वाढता विरोध पहाता पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. तसेच घटनास्थवरून काही महिलांना ताब्यात घ्येण्यात आले असून, बुलडोजरला रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे. घटनास्थळावर नागरिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
दरम्यान यापूर्वी देखील चार मे रोजी तुगलकाबादमधील एमबी रोडवरील अतिक्रमण हटवण्यात आले होते. यावेळी हे अतिक्रमण हटवण्यास नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. पोलीस संरक्षणात हे अतिक्रमण हटवण्यात आले होते. दक्षिण दिल्ली नागर निगमने देखील या अतिक्रमम हटाव मोहिमेचा विरोध केला होता. ही दुकाने संबंधित ठिकाणी गेल्या 15 वर्षांपासून असल्याचे त्यांनी म्हटले होते.