नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक मोठी आनंदवार्ता आली आहे. कारण केंद्र सरकारने सलग तिसऱ्या वर्षी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप पिकांच्या नवीन एमएसपीला मंजुरी (Central Ministry) देण्यात आली. तिळाच्या एमएसपीमध्ये 523 रुपयांनी, तूर आणि उडीद डाळीच्या एमएसपीमध्ये 300 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तांदळाची एमएसपी गेल्या वर्षीच्या 1,940 रुपये प्रति क्विंटलवरून 2,040 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 100 रुपये वाढवण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांत चांगल्या पावसाने खरीप अन्नधान्य उत्पादनात सरासरी 2.8% वाढ केली आहे आणि यामुळे खरीप उत्पादनात 2.5% वाढ होऊ शकते, रब्बी उत्पादनात 1.5% वाढ होऊ शकते. त्यामुळे गेली दोन वर्षे कोरोनाच्या कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी जमेची बाजू आहे. तसेच यंदाही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Cabinet approves MSPs for Kharif Marketing Season 2022-23: Union Minister Anurag Thakur pic.twitter.com/SIaZgb8EBF
— ANI (@ANI) June 8, 2022
गेल्या महिन्यात सरकारने चालू खरीप हंगामात खतांची उपलब्धता अंदाजे मागणीपेक्षा जास्त राहिल यावर भर दिला, तसेच या आर्थिक वर्षासाठी त्याचे अनुदान सुमारे ₹2.5 लाख कोटीपर्यंत वाढू शकते, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तसेच खातांच्या अवैध साठवणुविरोधातही सरकार कठोर पाऊलं उचलत आहे. तसेच शेतकऱ्यांनी घाबरून जास्त किंमतीत किंवा वेळेच्या अधीच खतं खरेदी करु नयेत, यावरही भर देत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या दोन वर्षात जगभरात कोरोनाने थैमान माजवलं आहे. त्याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. कारण या दोन वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना अनेकदा लॉकडाऊनला समोरे जावं लागलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल अनेकदा शेतात सडला आहे. राज्यातले अनेक शेतकरी हे कोरोनाकाळात कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. फक्त कोरोनाच नाही तर नैसर्गिक संकटं ही तर शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली आहेत. गेल्या काही दिवसात दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी, अशा अनेक संकटांचा सामाना शेतकरी करत आला आहे. त्यामुळे यंदा तरी चार पैसे शेतकऱ्यांच्या खिशात राहतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच ही बातमी समोर आल्याने बळीराजा सुखावला आहे.