सोलन : हिमाचल (Himachal) प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील मोठी येत असून येथे ट्रिंबर ट्रेल रोपवेवर केबल कारमध्ये (Cable car) बिघाड झाल्याचे समोर आले आहे. तर यात ट्रिंबर ट्रेल (Trimbar trail) रोपवेवर कॅबर कारमध्ये आठ जण अडकल्याचे समोर येत आहे. सध्या ही केबल कार हवेत अडकली असून या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. आता पर्यंत NDRF च्या टीम ने दोघांना सुखरूप बाहेर काढत त्यांना खाली उतरलवे आहे. तर अजूनही 9 जन त्या कॅबर कारमध्ये अडकलेले आहेत. तर या परिस्थितीवर NDRF ची टीम लक्ष ठेवून प्रत्येकाला रेस्क्यू करण्यात लागली आहे.
दरम्यान सोलनचे काँग्रेस आमदार कर्नल धनी राम शांडिल यांनी सांगितले की, डीसी यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच सर्वांना बाहेर काढण्यात येईल. तसेच गरज लागली तर लष्कराचीही मदत घेतली जाईल. त्याच वेळी तांत्रिक बिघाडामुळे ही केबल कार येथे मधोमध अडकल्याचे सांगितलं जात आहे. तर त्यामुळे ही अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान केबल कारमध्ये अडकलेल्या लोकांचे व्हिडिओही समोर आले आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून लोक त्यांना वाचवण्याचे आवाहन करत आहेत. एका व्यक्तीने सांगितले की, तो दीड तास ट्रॉलीमध्ये अडकला असून कोणतीही मदत मिळालेली नाही. मात्र हवेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
#HimachalPradesh :- Eleven People are stucked in the Timber Trail due to techanical problem. They have been getting rescued by the management.#Himachal
pic.twitter.com/EgMfJy0UPY— Gorish (@IGorishThakur) June 20, 2022