जोधपूर: आर्मीच्या 10 पॅरा (स्पेशल फोर्स) चा कॅप्टन अंकित गुप्ताचा सहाव्या दिवशीही शोध लागलेला नाही. राजस्थानात प्रशिक्षणादरम्यान 7 जानेवारीला अंकित गुप्ता बेपत्ता झाले होते. जोधपूरमधील ट्रेनिंग कँम्पमध्ये तख्त सागरात उडी मारल्यापासून बेपत्ता झाले आहेत. अंकित गुप्ता यांचा मार्कोस कमांडो आणि आर्मीच्या टीमकडून शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. (Captain Ankit Gupta untraceable after five days 12 teams starting search operation)
प्रशिक्षणादरम्यान अंकित गुप्ता यांनी त्यांच्या इतर तीन साथीदारासह तख्त सागर जलाशयात हेलिकॉप्टरमधून उडी मारली होती. इतर तिघे पाण्यातून बाहरे आले. मात्र, अंकित गुप्ता बाहेर आले नाहीत. 12 टीममधील 150 जवानांकडून अंकित गुप्तांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. गुप्तांनी हेलिकॉप्टरमधून त्याठिकाणी जलायशयाची खोली 46 फूटांच्या जवळपास आहे. पाण्यामध्ये मासेमारी साठी लावण्यात जाळे, वनस्पती आहेत त्यामध्ये कॅप्टन अंकित गुप्ता अडकले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कॅप्टन अंकित गुप्ता यांचा शोध लागला नसल्यामुळे रेस्क्यू टीमपुढं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अंकित गुप्ता हे गुरुग्राम येथील रहिवासी असून नुकतेच त्यांचे लग्न झाले होते. 23 नोव्हेंबरला 2020 ला अंकित गुप्तांचा विवाह झाला होता. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी ते जोधपूरला आले होते. अंकित गुप्ता बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे.
जोधपूरमधील तख्तसागर जलाशयात सेनादलाकडून प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अंकित गुप्ता आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना हेलिकॉप्टरमधून एक बोट जलाशयात फेकायची होती. त्याप्रमाणं त्यांनी ती फेकली त्यानंतर गुप्ता यांच्यासह इतर तीन जणांनी जलाशयात उड्या मारल्या. इतर तिघेजण पाण्यातून पोहत पोहत बोटीवर पोहोचले. मात्र, अंकित गुप्ता बोटीवर पोहोचले नाहीत. आर्मी, नेव्ही, एनडीआरएफ, एसडीआरफकडून कॅप्टन अंकित गुप्तांचा शोध घेतला जात आहे.
Special Forces’ Captain Ankit Gupta remains missing, search on at Jodhpur lake Last 48hrs. pic.twitter.com/c6PwHQAwyg
— Dr. Ashok Sharma (@ashok_aajtak) January 9, 2021
संबंधित बातम्या:
अवघ्या चार दिवसात भारतात कोरोनावरील लसीकरणास सुरुवात, संपूर्ण जगाचं भारताकडे लक्ष
16 तारखेपासून लसीकरणाचं महाअभियान, अफवांना आळा घालणं राज्यांचं कर्तव्य : नरेंद्र मोदी
(Captain Ankit Gupta untraceable after five days 12 teams starting search operation)