‘ते हिरो आहेत, आपल्या जीवाची पर्वा न करता…’ शहीद कॅप्टनच्या पत्नीचा व्हिडीओने देशवासियांच्या डोळ्यात पाणी

| Updated on: Jul 06, 2024 | 7:38 PM

Captain Anshuman Singh Video : चित्रपटामध्ये अभिनेता आपल्या प्राणांची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवताना आपण पाहिलं आहे. मात्र आपल्या देशासाठी कशाचीही पर्वा न करता आपले प्राण देणारे भारतीय सैनिक खरे हिरो आहेत. अशाच एका हिरोने आपल्या कुटूंबाचा ना कसलाच विचार न करता मृत्यूला कवटाळलं होतं. या हिरोच्या वीरपत्नीला कीर्ती चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ते हिरो आहेत, आपल्या जीवाची पर्वा न करता... शहीद कॅप्टनच्या पत्नीचा व्हिडीओने देशवासियांच्या डोळ्यात पाणी
Follow us on

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लष्कर आणि निमलष्करी दलातील 10 जवानांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र देऊन सन्मानित केलं. यामधील सात जणांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. यामध्ये कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेल्या सैनिकांमध्ये शहीद कॅप्टन अंशुमन सिंग यांचाही समावेश होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा सन्मान घेण्यासाठी त्यांची वीर पत्नी स्मृती सिंह आणि त्यांची आई आली होती. एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अंशुमन सिंग यांनी देशासाठी दिलेल बलिदान भारत कधी विसरणार नाही.

सियाचीनमध्ये ‘त्या’ रात्री काय घडलं?

कॅप्टन अंशुमन सिंग पंजाब रेजिमेंटच्या 26 व्या बटालियनच्या आर्मी मेडिकल कोरचा भाग होते. ऑपरेशन मेघदूत अंतर्गत अंशुमन सिंग सियाचीनमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होते. गेल्या वर्षी 19 जुलै रोजी सियाचीनच्या चंदनाच्या लाकडाच्या झोनमध्ये भीषण आग लागली होती.  दुर्घटनेत अंशुमन यांनी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात मदत केली होती. दरम्यान, आग वैद्यकीय तपासणी केंद्रात पसरली. हे पाहून कॅप्टन अंशुमनने जीवाची पर्वा न करता त्यात उडी घेतली. शहीद कॅप्टनने प्राण वाचवणारी औषधे आणि उपकरणे वाचावीत म्हणून केंद्रात प्रवेश केला होता. मात्र 17 हजार फूट उंचीवर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे आगीपासून वाचू शकले नाहीत. सियाचीनमध्येच शहीद झाले. लग्न झाल्यावर दोन महिन्यात त्यांची पोस्टिंग झाली होती.

 

18 जुलैला पत्नीसोबत बोलणं, अन् सकाळी शहीद

18 जुलै 2023 रोजी आम्ही बराच वेळ बोललो होतो. आम्ही आमच्या आयुष्यातील पुढील 50 वर्षे कशी असतील यावर चर्चा केली आणि आम्ही घर खरेदी करण्याबद्दल बोललो. 19 जुलैला सकाळी आम्हाला एक फोन आला की अंशुमन आता राहिले नाहीत. पहिले सात ते आठ तास आम्हाला विश्वास बसत नव्हता. कारण असं काही घडेल वाटलं नव्हतं, काही वेळाने मी स्वतःला सावरलं, पण आता माझ्या हातात कार्तीचक्र आहे. तीन लोकांचे परिवार वाटवण्यासाठी अंशुमन यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. आम्ही आमचे आयुष्य सांभाळू आणि त्यांनीपण खूप काही मॅनेज केलं होतं असं सांगताना वीर पत्नी स्मृती सिंह यांना अश्रू अनावर झाले.