कोळसा घोटळा : सीबीआयची ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक यांच्या पत्नीला नोटीस

| Updated on: Feb 21, 2021 | 3:48 PM

सीबीआयनं ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पुतण्या खासदार अभिषेक बनर्जी (Abhishek Banerjee) यांच्या पत्नी विरोधात चौकशीसाठी नोटीस जारी केली

कोळसा घोटळा : सीबीआयची ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक यांच्या पत्नीला नोटीस
प्रातिनिधिक फोटो - cbi
Follow us on

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसं राजकारण तापताना दिसत आहे. कोळसा तस्करी प्रकरणी सीबीआयनं ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पुतण्या खासदार अभिषेक बनर्जी (Abhishek Banerjee) यांच्या पत्नी विरोधात चौकशीसाठी नोटीस जारी केली आहे. अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा बनर्जी (Rujira Banerjee) यांना नोटीस देण्यासाठी सीबीआयची टीम कालीघाट येथील त्यांच्या घरी पोहोचली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयच्या टीममध्ये 5 जणांचा समावेश होता. (CBI notice to Mamata Banerjees nephew Abhishek Banerjees wife Ruchira Banerjee in coal scam)

सीबीआयची टीम पोहोचली पण…

कोळसा तस्करी प्रकरणी सीबीआयची टीम अभिषेक बनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी पोहोचली. मात्र, त्यावेळी घरी कोणीही नव्हते. यामुळे सीबीआयची टीम नोटीस घरावर चिकटवून परतील आहे. सीबीआयला रुचिरा बॅनर्जी यांची चौकशी करायची आहे. सीबीआयला रुचिरा यांचे कोळसा माफियांशी संबंध असल्याचा संशय आहे. नोटीसमध्ये सीबीआयनं रुचिरा बॅनर्जींना चौकशीत येण्याची गरज नसल्याचं म्हटलं होते. तर, सीबीआयची टीम घरी येऊन चौकशी करेल, असं म्हटलं आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी नोटीस मध्ये फोन नंबर दिले आहेत. त्यावर संपर्क साधण्यास सांगितलं आहे.

भाजपच्या निशाण्यावर अभिषेक बॅनर्जी

भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अभिषेक बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.कोळसा तस्करीसह इतर घोटाळ्यांमध्ये अभिषेक बॅनर्जींचा समावेश असल्याचा आरोप भाजप करतेय. भाजपच्या नेत्यांकडून अभिषेक बॅनर्जींना ममता बॅनर्जींकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप करण्यात येतो. तर, तृणमूल काँग्रेस आणि अभिषेक बॅनर्जी सातत्यानं भाजपचे आरोप फेटाळत आहेत.

अनुप मांझी सीबीआयच्या निशाण्यावर

कोळसा घोटाळ्याप्रकरणी तपास करताना सीबीआयला रुजिरा बॅनर्जी यांच्या खात्यात व्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे सीबीआयला रुचिरा यांची चौकशी करायची आहे. सीबीआयनं कोळसा घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालमधील 4 जिल्ह्यांमध्ये 13 ठिकाणी छापे टाकले होते. पुरुलिया, बांकुड़ा, पश्चिम बर्धमान आणि कोलकातामध्ये सीबीआयनं चौकशी केली आहे. पोलीस आणि सीबीआय कोळसा घोटाळ्यातील अनूप मांझीची चौकशी करत आहे. अनुप मांझी विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. अभिषेक बॅनर्जी यांचे निकटवर्तीय विनय मिश्रा यांचे नाव देखील या प्रकरणी समोर आले होते.

संबंधित बातम्या

मुख्यमंत्रीजी, तुम्ही दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांसोबत असायला हवं, आपच्या खासदाराचा सवाल

एमपी गजब है! ‘गोमूत्र फिनाईल’नेच ऑफिस साफ करण्याचा आदेश! बाबू लोकांसमोर धर्मसंकट

ममतांच्या पोस्टरवरील गुटख्याची पिचकारी भाजप नेत्यानं पुसली, काट्याची टक्कर असलेल्या बंगालमध्ये दिलासादायक चित्र

(CBI notice to Mamata Banerjee’s nephew Abhishek Banerjees wife Ruchira Banerjee in coal scam)