Padma Awards 2023 : पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून ‘या’ दिग्ग्जांना बहुमान?

| Updated on: Jan 25, 2023 | 11:25 PM

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्काराची विभागणी कार्यक्षेत्रानुसार पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री अशा 3 गटात केली जाते.

Padma Awards 2023 : पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून या दिग्ग्जांना बहुमान?
Follow us on

नवी दिल्ली : या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये पद्मभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण अशा 3 पुरस्कारांचा समावेश असतो. केंद्र सरकारने एकूण 106 जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड केली आहे. यामध्ये सर्वाधिक 91 पद्मश्री, 9 पद्मभूषण आणि 6 जणांची निवड ही पद्मविभूषण पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून एकूण 12 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री रवीना टंडन आणि प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन या दिग्गजांचा समावेश आहे. समाजसेवा, क्रीडा, कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, उद्योग या आणि यासारख्या क्षेत्रात अनन्यसाधारण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात.

डॉ. महालानबीस यांना मरणोत्तर पद्मविभूषण

पश्चिम बंगालचे माजी डॉ दिलीप महालानबीस यांना केंद्र सरकारकडून मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महालानबीस यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ महालानबीस यांचं ओआरएसच्या शोधात खारीचा वाटा आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने मरणोत्तर पुरस्कार जाहीर केला आहे.

पद्म पुरस्कारांची घोषणा

महाराष्ट्रातून कुणाचा सन्मान?

महाराष्ट्रातून रंगभूमी कलाकार परशुराम खुणे यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. खुणे यांनी नक्षल प्रभावग्रस्त भागातील युवकांचे पुनर्वसन यासह सामाजिक कारणांसाठी लोकनाट्य कलेचा वापर केला. खुणे यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या कामाची दखल घेत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.

परशुराम खुणे यांना पद्मश्री

महाराष्ट्रातील पुरस्कारनिहाय मानकरी

पद्मश्री

राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), परशुराम खुणे, भिकू रामजी इदाते, प्रभाकर मांडे, रमेश पतंगे, गजानन माने, रविना टंडन
आणि कुमी वाडिया.

पद्मभूषण

सुमन कल्याणपुर, दीपक धार आणि कुमार मंगलम बिर्ला.

पद्मविभूषण

झाकीर हुसेन (तबलावादक)