मध्य रेल्वेचे तिकीट आरक्षण या तारखेला मध्यरात्री ते पहाटेपर्यंत बंद, पाहा कधी ?

| Updated on: Dec 12, 2024 | 9:33 PM

मध्य रेल्वेच्या मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टमच्या (पीआरएस) अपडेटसाठी ही यंत्रणा काही काळासाठी बंद राहणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. त्यामुळे प्रवाशांनी या महत्त्वाच्या देखभाल कार्यासाठी सहकार्य करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाने केलेली आहे.

मध्य रेल्वेचे तिकीट आरक्षण या तारखेला मध्यरात्री ते पहाटेपर्यंत बंद, पाहा कधी ?
prs counter
Follow us on

भारतीय रेल्वेने दररोज अडीच कोटी रेल्वे प्रवासी प्रवास करीत असतात. लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीटांचे आरक्षण करण्यासाठी अनेक जण पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टमवर ( पीआरएस )आणि आयआरसीटीसीच्या तिकीट बुकींग यंत्रणेवर अवलंबून असतात. मात्र रेल्वेच्या मेल – एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकर प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम ( पीआरएस ) काही तांत्रिक कारणासाठी येत्या १४.१२.२०२४ च्या मध्यरात्री ते दि. १५.१२.२०२४ च्या पहाटे पर्यंत बंद राहील असे मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मुंबईतून तिकीट आरक्षण करता येणार नाही

मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीएनआर कॉम्प्रेशनसाठी मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम ( पीआरएस ) येत्या १४ डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्रीपासून ते १५ डिसेंबर २०२४ च्या पहाटे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे. मुंबईच्या पीएनआर कॉम्प्रेशनसाठी मुंबईतील पीआरएस प्रवासी आरक्षण प्रणाली दिनांक १४ डिसेंबरच्या २०२४ च्या रात्री ११.४५ वाजल्यापासून दि. १५ डिसेंबर २०२४ च्या पहाटे ०४.४५ वाजेपर्यंत बंद राहील असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

इंटरनेट तिकीट बुकींग देखील बंद

प्रवासी तिकीट आरक्षण प्रणाली बंद असल्यामुळे, पीआरएस सेवा, कोचिंग रिफंड सेवा आणि इतर सेवा उदाहरणार्थ आयव्हीआरएस, चालू आरक्षण, चार्ट डिस्प्ले, टच स्क्रीन, रिफंड काऊंटर आणि कोचिंग रिफंड टर्मिनल इत्यादी सेवा देखील या वेळेत उपलब्ध होणार नाहीत. यामुळे प्रवाशांना सध्याच्या रिफंड नियमांनुसार परताव्यासाठी टीडीआर जारी केला जाईल.वर नमूद केलेल्या कालावधीत मुंबई पीआरएस गाड्यांसाठी इंटरनेट बुकिंग देखील उपलब्ध होणार नसल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा