दिल्ली : जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून अनिल चौहान (Anil Chauhan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रावत यांच्या निधनानंतर 9 महिन्यांनी केंद्र सरकारने (Central Government) हा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाच्यामाध्यमातून काढण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. अनिल चौहान हे आता लष्करी विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहणार आहेत.
गेल्या 9 महिन्यांपासून हे पद रीक्त होते.सीडीसीचे माजी जनरल बिपीन रावत यांचे अपघातामध्ये निधन झाले होते. त्यानंतर आता ही जबाबदारी निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
अनिल चौहान यांनी 40 वर्षात लष्करी कारकिर्दीत कमांड, स्टाफ आणि इंस्ट्रूमेंटल पदांवर काम केलं होतं. शिवाय त्यांना जम्मू-काश्मीरमधील बंडखोरीविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे. त्यांचे कार्य हे संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातूनच समोर मांडण्यात आले आहे. ते एक निवृत्त अधिकारी असले तरी त्यांच्या अनुभवाचा भारतीय लष्करामध्ये मोठा फायदा होणार आहे.