मुंबई : भारताची ‘चांद्रयान 3′ मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित केली. सर्व देशवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. LVM3-M4 रॉकेट द्वारे प्रक्षेपित केलेल्या मोहिमेअंतर्गत पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO ने सांगितले की 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 चं संध्याकाळी 5.47 वाजता सॉफ्ट लँडिंग केलं होणार आहे.
चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण आज संपूर्ण देशाने पाहिले आहे. मात्र, आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आसामच्या उत्तरेकडील एका गावात मोठा उत्साह पाहायला मिळाला. याचं कारण म्हणजे या प्रक्षेपणाची कमान आसामच्या एका सुपुत्राने सांभाळली होती.
आसामच्या या सुपुत्राचं नाव आहे चयन दत्ता. चयन दत्ता यांनी चांद्रयान 3 मिशनमध्ये डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टरची भूमिका बजावली होती. त्यामुळे आज त्यांचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. चयन यांचे आई-वडील हे लखीमपुरमध्ये एक दुकान चालवतात. तसेच मुलाच्या या कामगिरीनंतर त्यांचे वडील रणजित दत्ता म्हणाले की, आमचा मुलगा सर्वांच्या आशीर्वादाने तिथपर्यंत पोहोचला आहे.
दरम्यान, चयंत दत्ता तेजपूर विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते अवकाश विभागाच्या युवा उपग्रह केंद्रात वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. चयन हे जानेवारीमध्ये आपल्या घरी आले होते. त्यानंतर ते कामावरती परत आल्यानंतर घरच्यांसोबत फोनवर शेवटचे बोलले होते. सध्या चयन यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसतंय.