मुंबई : इस्रोनं चंद्रयान 2 मधून बराच बोध घेत चंद्रयान 3 मोहीम हाती घेतली आहे. यावेळी चंद्रयान 3 चं चंद्रावर पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग होईल अशी प्रत्येक भारतीयांना आशा आहे. कारण चंद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत व्यवस्थितरित्या पोहोचलं असून संपर्कही जबरदस्त होत आहे. पण आता पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगची प्रतीक्षा आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोने या लँडिंगची तारीखही जाहीर केली आहे. इस्रोच्या मते चंद्रयान 3 हे 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर उतरेल. पण आता इस्रोकडून याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती खुद्द इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. कारण चंद्रयान चंद्रावर उतरवण्यासठी सपाट पृष्ठभागाचा शोध घेणं खूपच कठीण झालं आहे.
लँडर मॉड्युलमध्ये लागलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून काही फोटो शेअर करण्यात आले आहे. इस्रो अधिकारी या कॅमेऱ्यातून टिपलेल्या फोटोच्या माध्यमातून सपाट पृष्ठभाग शोधत आहेत. पण अजून तसा भाग काही निदर्शनास आला नाही. त्यामुळे चंद्रयान 3 चंद्रावर उतरण्यासाठी काही दिवसांचा अवधी अजून लागू शकतो.
#WATCH चंद्रयान के चांद पर उतरने से 2 घंटे पहले हम लैंडर और चांद की स्थिति का जायजा लेंगे और उसके बाद लैंडर के चांद पर लैंड कराने पर फैसला लेंगे। अगर हमें लगेगा की लैंडर या चांद की स्थिति उतरने के लिए ठीक नहीं है तो हम इसे 27 अगस्त तक के लिए आगे बढ़ा देंगे। हम 23 अगस्त को लैंडर… pic.twitter.com/iS2MKnUkVY
— ANI_HindiNews (@AHindinews) August 21, 2023
गुजराजच्या अहमदाबादमधील इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे व्यवस्थापक निलेश एम. देशी यांनी तारीख बदलली जाऊ शकते अशी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, चंद्रयान चंद्रावर उतरवण्याच्या दोन तास आधी लँडर आणि चंद्र यांच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल. तिथली स्थिती योग्य असल्यास लँडर चंद्रावर उतरवण्याचा निर्णय घेतला जाईल. जर स्थिती योग्य नसेल तर मात्र चंद्रावर लँडर उतरवण्याची तारीख 27 ऑगस्टपर्यंत वाढवली जाऊ शकते. असं असलं तरी सध्या 23 ऑगस्टलाच लँडर उतरवण्याचा मानस आहे.
चंद्रावर चंद्रयान लँडिंग लाइन ब्रॉडकास्ट केलं जाणआर आहे. इस्रोच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडलवर लाईव्ह ब्रॉडकास्टिंग बघण्याची संधी मिळेल. इतकंच नाही तर तज्ज्ञ व्यक्तींकडून माहितीही मिळेल.