श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान ३ लाँच केलं. याची लाँचिंग आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून करण्यात आली. या चंद्रयानाला चंद्रावर पोहचण्यासाठी ४२ दिवस लागतील. २३ ऑगस्ट रोजी चंद्रावरील दक्षिण भागात हा यान लँड होईल. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत अमेरिका, सोव्हियत संघ (रशिया) आणि चीनच्या यादीत येणार आहे. यापूर्वी २०१९ ला चंद्रयान २ मिशन लाँच करण्यात आले. परंतु, सॉफ्ट लँडिंगच्या वेळी हे मिशन फेल झाले.
अपयश आलं तरी शास्त्रज्ञांनी हार मानली नाही. पुन्हा चार वर्षांनंतर चंद्रयान ३ मिशन लाँच केले. चंद्रयान ३ चे वजन ३९०० किलोग्रॅम आहे.
चंद्राच्या कक्षेचे परिभ्रमण करून २३ ऑगस्ट रोजी हे चंद्रयान ३ दक्षिण पोलवर लँड होईल. इसरोचे प्रमुख सोमनाथ यांनी ही माहिती दिली.
चंद्रयान ३ चा उद्देश हा चंद्रावर परीक्षण करणे आहे. याची माहिती इसरोला प्राप्त करून दिली जाईल. चंद्रयान ३ चा खर्च चंद्रयान २ पेक्षा कमी आहे. चंद्रयान ३ चा संपूर्ण खर्च ६१५ कोटी रुपये आला. चंद्रयान २ साठी ९७८ कोटी रुपयांचा खर्च आला होता.
चंद्रयान २ मोहिमेत लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर होता. चंद्रयान ३ मध्ये स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल आहे. चंद्रयान २ मुळे चंद्राच्या भूभागाचा अभ्यास करता येणार आहे. तेथील माती तसेच वातावरणाचा अभ्यास करता येणार आहे. १४ जुलैला हे चंद्रयान आकाशात झेपावले. ४५ ते ५० दिवसांत चंद्रावर लँड होणार आहे. दहा टप्प्यात हे मिशन पूर्ण होईल.