नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : भारताचं महत्वाकांक्षी चंद्रयान-3 ने आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करण्याच्या दिशेने काऊंट डाऊन सुरु केले आहे. काल चंद्रयान-3 चं प्रॉपल्शन मॉड्युल आणि लँडर मॉड्युल वेगळे झाले होते. आता पुढचा प्रवास विक्रम लॅंडरला एकट्याने करावयाचा आहे. शुक्रवारी सायं. 4 वाजता चंद्रयानच्या विक्रम लॅंडरने इंजिनांना डीबूस्टींग करुन कक्षा घटविली आहे. म्हणजेच यानाला ब्रेक लावून त्याचा वेग थोडा कमी केला आहे. आता 113 km x 157 km या कक्षेत ते फिरत आहे. 23 ऑगस्ट रोजी विक्रम लॅंडर चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे.
चंद्रयान-3 मोहिम सर्वात स्वस्त म्हणजे अवघ्या 615 कोटी रुपयात राबविण्यात येत आहे. 23 ऑगस्ट रोजी सायं. 5.47 वा. जर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लॅंडीग झाले तर भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश ठरणार आहे. आज शुक्रवारी विक्रम लॅंडरचा वेग कमी करण्यात आला. ही प्रक्रीया 20 ऑगस्टलाही केली जाईल. त्यानंतर चंद्रापासून लॅंडरचे किमान अंतर 30 किमी होईल. सर्वात कमी अंतरावर पोहचल्यानंतर 23 ऑगस्टला सॉफ्ट लॅंडींग होईल.
विक्रम लॅंडरच्या कॅमेऱ्यातून काढलेला चंद्राचा व्हिडीओ येथे पाहा –
Chandrayaan-3 Mission:
View from the Lander Imager (LI) Camera-1
on August 17, 2023
just after the separation of the Lander Module from the Propulsion Module #Chandrayaan_3 #Ch3 pic.twitter.com/abPIyEn1Ad— ISRO (@isro) August 18, 2023
याआधी 17 ऑगस्टला चंद्रयान-3 प्रॉपल्शन मॉड्यूलला लॅंडर-रोव्हरपासून वेगळे केले होते. त्यानंतर लॅंडरने प्रॉपल्शन मॉड्यूलला, ‘ थॅंक्स फॉर द राइड मेट’ याच दरम्यान लॅंडरने लावलेल्या कॅमेऱ्यांनी प्रॉपल्शन मॉड्यूलसह चंद्राचे फोटो काढले. इस्रोने त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
द्रयानच्या लॅंडरच्या चारही पायांना 800 न्यूटन शक्तीचे 1-1 थ्रस्टरमुळे ते शक्य होईल, दोन-दोन टप्प्यात ते काम करतील. 30 किमी उंचीवरुन लॅंडींग प्रक्रीया सुरु होईल. लॅंडरचा वेग 1680 मीटर प्रति सेंकदावरुन 2 मीटर प्रति सेंकद आणावा लागेल. लॅंडर आणि रोव्हर शक्तीसाठी सोलर पॅनल लावले आहेत. लॅंडरला व्हर्टीकल शेप आणावे लागेल. त्यानंतर सर्वकाही सुरळीत पडल्यावर लॅंडींग यशस्वी होईल. हे विक्रम लॅंडर 14 दिवस ( चंद्राचा एक दिवस ) काम करणार आहे. जसा सूर्य उगवेल तसे सोलार पॅनल काम सुरु करतील.