मुंबई : चंद्रयान 3 चं विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आलं असून गेल्या दोन दिवसांपासून आपलं काम सुरु केलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील माहिती, फोटो आणि व्हिडीओ पाठवण्याचं काम सुरु झालं आहे. त्यामुळे प्रत्येकालाच या मोहिमेत घडणाऱ्या घडामोडींबाबत उत्सुकता आहे. आता इस्रोने आणखी एक माहिती जाहीर केली आहे. यात प्रज्ञान रोव्हरने 26 फूट म्हणजेच 8 मीटर पर्यंतचं अंतर कापलं आहे. इतकंच काय तर रोव्हर, लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूल व्यवस्थितरित्या काम करत आहे. प्रज्ञान रोव्हर आता कसं काम करतंय याबाबतची उत्सुकता ताणली आहे.
प्रज्ञान रोव्हरला दोन पेलोड्स लागले आहेत. पहिला म्हणजे लेजर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप. या माध्यमातून एलिमेंट कंपोजिशन याचा अभ्यास केला जाणार आहे. मॅग्निशियम, अल्यूमिनियम, सिलिकन, पोटॅशियम, कॅल्शियम, टिन आणि लोह खनिजाबाबत माहिती घेतली जाईल. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीकोनातून योजना राबवली जाईल. दुसरा पेलोड्स हा अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोमीटर आहे. या माध्यामातून चंद्रावरील रसायनांची मात्रा आणि गुणवत्ता यांचा अभ्यास केला जाणार आहे.
Chandrayaan-3 Mission:
All planned Rover movements have been verified. The Rover has successfully traversed a distance of about 8 meters.
Rover payloads LIBS and APXS are turned ON.
All payloads on the propulsion module, lander module, and rover are performing nominally.…
— ISRO (@isro) August 25, 2023
इस्रोने रोव्हर प्रज्ञान लँडरच्या बाहेर निघाल्याचा एक व्हिडीओ जारी केला होता. लँडरच्या इमेजर कॅमेऱ्यात हा संपूर्ण घडामोड चित्रित झाली आहे.
Here is how the Lander Imager Camera captured the moon's image just prior to touchdown. pic.twitter.com/PseUAxAB6G
— ISRO (@isro) August 24, 2023
चंद्रयान 3 रोव्हरचं वजन 26 किलो इतकं आहे. हे तीन फूट लांब, 2.5 फूट रुंद आमि 2.8 फूट उंच असणार आहे. हे रोव्हर सहा चाकांवर चालतं. हे रोव्हर 1600 पर्यंतचं अंतर कापू शकते. याचा स्पीड 1 सेंटीमीटर प्रति सेकंद इतका आहे. अजून 12 दिवस हे रोव्हर काम करेल. त्यानंतर 14 दिवस रात्र असणार आहे. लँडर मॉड्युल 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं होतं. या भागात सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश आहे. चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश आहे.