नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : भारतीय अंतराळ संस्था इस्रोचे चंद्रयान-3 आता काही वेळातच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करणार आहे. इस्रोच्या या महत्वाकांक्षी चंद्रयान-3 मोहीमेकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे. वैज्ञानिक आणि अभ्यासकांसह सामान्य नागरीकांचे देखील लक्ष याकडे लागले आहे. चंद्रयान-3 मोहिमेनंतर चंद्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. अनेकांना चंद्राबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. तर चंद्राच्या बाबतील काही रहस्य येथे आपण पाहणार आहोत.
– आपल्या पृथ्वीप्रमाणे चंद्र काही गोलाकार नाही. पोर्णिमेला आपल्या गोलाकार चंद्र जरी पाहायला मिळत असला तरी एक पृथ्वीचा एक नैसर्गिक उपग्रह म्हणून त्याचा आकार चेंडूसारखा गोल नाही तर अंडाकार आहे. चंद्राकडे आपण पाहतो तेव्हा त्याचा काहीच भाग आपल्याला दिसतो. त्याचे भूमितीय आकाराचा केंद्र क्रेंद्रपासून 1.2 मैल दूर आहे.
– पोर्णिमेच्या चंद्राच्या तुलनेत सूर्य 14 पट अधिक प्रकाश मान आहे. जर प्रोर्णिमेच्या चंद्राकडून सूर्याएवढा प्रकाश हवा तरप 398,110 चंद्राची गरज लागेल. चंद्राला स्वत:चा प्रकाश नाही. चंद्रग्रहण लागते तेव्हा चंद्र पृथ्वीच्या छायेत येतो. तेव्हा त्याच्या पृष्ठभागाचे तापमान 500 डीग्री फॅरेनहाईट कमी होते. याप्रक्रीयेला 90 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो.
– चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा त्याला पेरिग्री म्हणतात. यावेळी भरती आणि ओहोटीचा स्तर सामान्यापेक्षा जादा असतो. चंद्र पृथ्वीची गती देखील कमी करीत असतो त्यामुळे पृथ्वीची गती दर शताब्दीला 1.5 मिलीसेंकद धीमी होते.
– चंद्रयान-3 दक्षिणी ध्रुवावर लॅंड करणार आहे. येथे खोल खड्डे आणि पर्वत आहेत. नासाच्या मते या भागातील काही खड्डे इतके खोल आहेत की तेथे अब्जावधी वर्षे सूर्याची किरणे पोहचलेली नाहीत.
– चंद्राच्या विविध कला आपल्याला दिसतात. चंद्राच्या काही हिस्साच आपल्याला दिसत असतो. पृथ्वी आणि चंद्राच्या परिवलन असे होते. लिओनार्दा दा विंचीने प्रथम सांगितले की चंद्र आंकुचन आणि प्रसरण पावत नाही. तेवढ्याच भागावर सूर्याचा प्रकाश पोहचल्याने तो भाग दिसतो.
– चंद्रावरील खड्डे वा क्रेटरना इंटरनॅशनल एस्ट्रॉनॉमिकल युनियन नावे देते, त्यात प्रसिध्द शास्रज्ञ, कलाकार, अंतराळवीर, एक्सप्लोरर्स यांची नावे क्रेटरना दिली आहेत.