मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : आता प्रवाशांना लवकरच नव्या आधुनिक वंदेभारतचा प्रवास अनुभवता येणार आहे. केशरी आणि करड्या रंगातील नवीन वंदेभारत चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यातून बाहेर पडली आहे. या नव्या फिचर्सने नटलेल्या वंदेभारत एक्सप्रेसची निर्मिती सुरु असताना चेन्नईच्या रेल्वे कारखान्यात जाऊन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तिची पाहणी केली होती. वंदेभारतचा स्लीपर्स कोच या आर्थिक वर्षांत दाखल होणार आहे. तसेच इंटर सिटी मार्गावर वंदेभारत मेट्रो देखील धावणार आहे.
आतापर्यंत निळ्या रंगाची ओळख बनलेल्या वंदेभारतच्या नव्या केशरी आणि करड्या रंगसंगतील आवृत्तीचे लवकरच अनावरण होणार आहे. चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यातून अशी नव्या रंगाची आणि नव्या आधुनिक वैशिष्ट्यांची वंदेभारत बाहेर पडली आहे. आता अशा सुधारीत श्रेणीच्या 25 वंदेभारत तयार करण्यात येत आहेत. गेल्यावर्षीपासून आयसीएफमध्ये 2,702 डबे तयार झाले आहेत. त्यात 2,261 एलएचबी डबे तर 12 वंदेभारत नवीन आवृत्तीचे डबे आहेत. येत्या वर्षात वंदेभारतच्या नव्या गाड्यांसह सुमारे तीस प्रकारातील 3,241 डबे तयार करण्याची योजना आहे.
नव्या वंदेभारत पाहा व्हिडीओ –
The new look #VandeBharatExpress roll out of ICF Chennai.
Does this Livery good or the earlier one.#Chennai #VandeBharat #OrangeVandeBharat#ICF
📽️ via WA credits Unknown. pic.twitter.com/y8p42s9t1X
— मुंबई Matters™✳️ (@mumbaimatterz) August 19, 2023
वंदेभारतच्या मेट्रो वंदेभारतची ही आवृत्ती आणणार असून ती इंटर सिटी म्हणून कमी अंतराच्या शहरात धावणार आहे. प्रवाशांना सहज चढता आणि उतरता येण्यासाठी यात दुहेरी उघडझाप होणारा दरवाजा असेल.
लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी आयसीएफ स्लीपरकोचवाली वंदेभारत तयार करणार आहे. या स्लीपर्स कोच वाल्या वंदेभारतची सुरुवात मुंबई ते दिल्ली मार्गावरुन होण्याची शक्यता आहे. येत्या वर्षांत ही स्लीपर कोच वंदेभारत तयार होणार आहे.
चेन्नईच्या आयसीएफ (ICF) कारखान्यात आता जम्मू आणि काश्मीरसाठी नवीन तंत्राची वंदे भारत ट्रेन देखील विकसित करण्यात येत आहे. या वंदेभारत एक्सप्रेसच्या कोचमध्ये वातावरण गरम करण्याची सुविधा असणार आहे. तसेच पाण्याच्या पाईप्स लाईन्स गोठू नये यासाठी खास तंत्रज्ञान असणार आहे. पुढच्या वर्षी ही ट्रेन सुरू होणार आहे.
– अधिक आरामदायी करण्यासाठी आसनांच्या कोनात बदल
– आसनांना उत्तम सीट कुशन
– मोबाइल चार्जिंग पॉईंट अधिक सोयीस्कर
– एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये लेग रेस्ट अधिक रुंद
– पाण्याचा उडून अंगावर येऊ नये यासाठी खोल वॉश बेसिन
– टॉयलेटमध्ये उत्तम प्रकाशयोजना
– ड्रायव्हिंग ट्रेलर कोचमध्ये (दिव्यांग ) व्हील चेअरसाठी तरतूद
– रीडिंग लॅम्प टचिंगमध्ये बदल रेझिस्टीव्ह ऐवजी कॅपेसिटीव्ह टच
– रोलर ब्लाइंड फॅब्रिक आणि अँटी क्लाइंबिंग डिव्हाइस