नवी दिल्ली : छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित बीजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले. सुरक्षा दलाला बेपत्ता झालेल्या 17 जवानांचे मृतदेह मिळून आले. या हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आसामचा दौरा रद्द केलाय. अमित शाह हे आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौऱ्यावर होते. आज शाह यांच्या 3 प्रचार रॅली होणार होत्या पण त्यातील एकच रॅली पार पडली. त्यानंतर पुढील कार्यक्रम रद्द करुन शाह दिल्लीला परतले आहेत.(Amit Shah’s visit to Assam canceled after Naxal attack in Chhattisgarh)
शनिवारी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जोनागुडा गावात हा नक्षलवादी हल्ला झाला. त्यावेळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये मोठी चकमक झाली. त्यावेळी 5 जवान शहीद झाले तर 30 जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. तर 18 अन्य जवान बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आज 17 जवानांचे मृतदेह मिळून आले आहेत. त्यामुळे नक्षलवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शहीदांची संख्या 22 झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आसामचा दौरा रद्द केलाय. या हल्ल्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी शाह दिल्लीला परतले आहेत.
22 security personnel have lost their lives in the Naxal attack at Sukma-Bijapur in Chhattisgarh, says SP Bijapur, Kamalochan Kashyap
Visuals from the Sukma-Bijapur Naxal attack site pic.twitter.com/C3VvAdvjaN
— ANI (@ANI) April 4, 2021
आजतकच्या वृत्तानुसार, बिजापूर, सुकमा आणि कांकेर येथे नक्षलवाद्यांकडून सातत्याने कँप लावले जात होते. या कँपमध्ये सुमारे 200 ते 300 नक्षलवादी सहभागी होत होते. तर सुरक्षा दलाच्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांचे डिव्हिजनल कमांडर छत्तीसगडच्या बिजापूर कँम्पमध्ये राहत होते. बिजापूरमध्ये आयईडी प्लांट करण्याची नक्षलवाद्यांची योजना होती, अशी माहितीही समोर येत आहे.
On ground visuals from the site of Naxal attack at Sukma-Bijapur border in Chhattisgarh; 22 security personnel have lost their lives in the attack pic.twitter.com/sVCoyXIRwN
— ANI (@ANI) April 4, 2021
या घटनेनंतर डीजी सीआरपीएफ कुलदीप सिंग हे छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. घटनेची माहिती घेण्यासाठी ते छत्तीसगडला जाणार आहेत. गृहमंत्रालयाने डीजींना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या घटनेत पाच जवान शहीद झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. शहीद जवानांना देश कधीच विसरणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
Sukma Naxal attack: बेपत्ता जवानांपैकी 14 जणांचे मृतदेह सापडले; शहीद जवानांचा आकडा 22 वर
Amit Shah’s visit to Assam canceled after Naxal attack in Chhattisgarh