नवी दिल्ली: छत्तीसगढच्या बिजापूर येथील जंगलात शनिवारी नक्षलवादी (Naxal Attack) आणि भारतीय जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. या चकमकीत 22 भारतीय जवान शहीद झाले. तर 31 जवान जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय सुरक्षादलांवर नक्षलवाद्यांकडून झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. (Chhattisgarh Maoist attack How a massive security operation was planned and how it went wrong)
या चकमकीपूर्वी नक्षलवाद्यांनी भारतीय जवानांना रणनीती आखून जंगलाच्या आतमध्ये येऊन दिले. 300 ते 400 नक्षलवाद्यांनी भारतीय जवानांच्या एका तुकडीला चारही बाजूंनी घेरले. त्यानंतर भारतीय जवानांवर गोळीबार करण्यात आला. नक्षलवाद्यांचा कमांडर हिडमा या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जाते.
कमांडर हिडमाविषयी भारतीय सुरक्षादलांकडे फारशी माहिती उपलब्ध नाही. सुरक्षादलांकडे असलेले त्याचे छायाचित्रही तरुणपणातील आहे. त्यामुळे कमांडर हिडमा आत्ता नेमका कसा दिसतो, हे कोणालाही माहिती नाही. मात्र, सुरक्षादलांच्या अंदाजानुसार कमांडर हिडमा साधारण 40 वर्षांची व्यक्ती आहे. हिडमाचे खरे नाव हिडमन्ना असून तो सुकमा जिल्ह्यातील पूवर्ती गावाचा रहिवासी आहे. तो पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा प्रमुख आहे. या दलात जवळपास 250 नक्षलवादी सामील आहेत. नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीमध्ये या हिडमाच्या गटाचा समावेश आहे.
अत्यंत कमी वयात हिडमा नक्षलवाद्यांच्या प्रमुख नेत्यांपैकी एक झाला आहे. त्याचा वावर अत्यंत गुप्त असल्याने त्याच्याविषयी सुरक्षादलांकडे फारशी माहिती उपलब्ध नाही. कमांडर हिडमाला पकडण्यासाठी 40 लाखांचे इनामही घोषित करण्यात आले आहे. भीम मांडवी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही कमांडर हिडमावर आरोपपत्र दाखल केले होते. हिडमा हा नक्षलवाद्यांच्या PLGA बटालियन 1 चे नेतृत्त्व करतो. पामेड, कोंटा, जगरगुंडा, बासगुडा हा परिसर या बटालियनच्या अखत्यारित येतो.
संबंधित बातम्या:
Chhattisgarh Naxal Attack : नक्षलवादी हल्ल्यानंतर अमित शाहांची उच्च स्तरीय बैठक
Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यानंतर अमित शाहांचा आसाम दौरा रद्द
(Chhattisgarh Maoist attack How a massive security operation was planned and how it went wrong)