रायपूर : कोरोनाचे संकट कमी होते म्हणून की काय, छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका हॉस्पिटलला आग लागली आहे. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रायपूरच्या पचेडी नाक्याजवळच्या राजधानी हॉस्पिटलमध्ये ही आग लागली आहे. याच हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे पेशेटंही भरती होते. (Chhattisgarh Raipur Rajdhani hospital fire)
Chhattisgarh: Visuals from a hospital in Raipur, after fire broke out there last night pic.twitter.com/JUy6ubRF2m
— ANI (@ANI) April 18, 2021
जवळपास 50 रुग्णांवर उपचार सुरु होते. आयसीयूत शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचं सांगितलं जात आहे. रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. 5 मृतांपैकी एकाचा मृत्यू आगीत भाजल्यानं झाला आहे तर इतर 4 जणांचा मृत्यू ऑक्सिजन सप्लाय बंद पडल्यानं झाला आहे. आगीमुळे रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा बंद पडला होता. पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या टीमनं बचाव कार्य केलं. (Chhattisgarh Raipur Rajdhani hospital fire)
संबंधित बातम्या :
मोदी सरकारने Remdesivir केले स्वस्त, कोरोना रुग्णांना मोठा दिलासा, जाणून घ्या लिस्ट
Explained: कोरोना निदानात पल्स ऑक्सिमीटरचं महत्त्व वाढलं, काय उपयोग, कसं वापरावं, किंमत किती?