नवी दिल्ली : एनडीएच्या मित्र पक्षांची बैठक दिल्लीत होत आहे. त्यानिमित्त राज्यातील शिंदे गटाचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे नवी दिल्लीत दाखल झालेत. एकूण ३८ पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार आहेत. त्यात महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन गटांचे नेते एनडीएमध्ये सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्र एक मोठा राज्य आहे. लोकसभेच्या राज्यात ४८ जागा आहेत. आम्ही भाजपसोबत काम करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षांत काम केलं. ते बोलकं आहे. काँग्रेसला ५० वर्षांत न जमलेलं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांत केलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती दिली. देशाला जगात १० व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणलं.
नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार, १३ कोटी जनता बीपीएलच्या बाहेर आली. जगात भारताचे नाव आदरानं घेतलं जातं. फ्रान्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला. अरब देशांनी सन्मान केला. कुणी मोदी यांना बॉस म्हणतो तर कुणी ऑटोग्राफ घेतो. कुणी नमस्कार करतो. जी २० चं अध्यक्षपद देशाला मिळालं हे सगळं देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं.
बदलत्या परिस्थितीनुसार २०२४ ची लोकसभा निवडणूक देशात होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात २०२४ साली अनेक रेकॉर्ड तुटतील. विरोधी पक्ष हे स्वार्थासाठी द्वेषाने पछाडलेले आहेत. मोदी यांना विरोध करता, ही कुठली नीती आहे. जेवढा विरोध मोदी यांना करतील तेवढ्या मोदी यांच्या जागा वाढतील. हे आपण २०१४ आणि २०१९ ला पाहिलंय.
२०२४ मध्ये मोदी यांच्या नेतृत्वात आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ट तुटतील. कारण नरेंद्र मोदी यांनी जे काँग्रेसच्या ५० वर्षांत झाले नव्हते ते मोदी यांनी ९ वर्षांत करून दाखवलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.