China Plane Crash नवी दिल्ली : चीनमध्ये (China) एक मोठा विमान अपघात झाला आहे. चीनचं बोईंग 737 विमान क्रॅश (Boeing737 crash ) होऊन कोसळलं. यानंतर जंगलात विमान जळून खाक झाल्याची माहिती आहे. 133 प्रवासी त्या विमानातून प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. किती जणं दगावले आणि किती वाचले आहेत यासंदर्भात माहिती समोर आलेली नाही. विमान गुआंगशी या प्रांतात जंगलात कोसळलं. विमान कोसळल्यानंतर जळून खाक झाल्याची माहिती आहे. विमानातून प्रवास करणारे 133 प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
चीन मध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. चीनमधील बोईंग 737 हे विमान 133 प्रवाशांना घेऊन जात असताना चीनच्या गुआंगशी इथं आज विमानाला अपघात झाला. या अपघातात 133 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अपघात झाल्यानंतर विमानाला भीषण आगल्याचं देखील समोर आलं आहे.
Video footage taken by local villagers shows the aftermath of a plane crash in south China on Monday. The Boeing 737 crashed with 132 people on board.
CGTN has the latest updates: https://t.co/KenJaQ0l9O pic.twitter.com/JMHh7viEeA
— CGTN (@CGTNOfficial) March 21, 2022
रायटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार चीनचं बोईंग 737 हे विमान Kunming येथून Guangzhou कडे जात होतं. हे विमान Guangxi या भागात कोसळलं आहे. यानंतर विमानानं पेट घेतला. विमान कोसळल्यानंतर पेट घेतल्यानंतर जंगल देखील पेटल्याचं समोर आलं आहे.
MU5735 या विमानानं दक्षिण पश्चिम चीन मधील युन्नान प्रांतातील Kunming शहरातील Changshui विमानतळावरुन 1.15 वाजता उड्डाण घेतलं होतं, तर ते 3 वाजेपर्यंत हे विमान Guandong प्रांतातील Guangzhou येथे पोहोचणार होतं. मात्र त्यापूर्वीच विमान दुर्घटनाग्रस्त झालं.
विमान कोसळतानाचा व्हिडीओ:
Video : चीनचं बोईंग विमान कोसळल्याचा व्हिडीओ, विमानात 133 प्रवासी होते pic.twitter.com/a24JF9g2kt
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2022
वृत्तसंस्था Xinhua नं दिलेल्या माहितीनुसार बचावपथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. जे विमान दुर्घटनाग्रस्त झालं ते 6 वर्षांचं आहे. जून 2015 मध्ये या विमानाचा वापर करण्यास सुरुवात झाली होती. या विमानात 162 सीट होत्या. त्यापैकी 12 बिझनेस क्लास आणि 150 इकोनॉमी क्लासच्या होत्या.
इतर बातम्या:
Pune Metro cess| पुण्यात बांधकाम व्यवसायिकांसह, सर्वसामान्य नागरिक धास्तीत ; मेट्रो सेस लागणार का?