नवी दिल्ली : तैवानवरुन चीनकडून भारतीय खासदारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. नवी दिल्लीतील चिनी राजदूताच्या कार्यालयाकडून बीजू जनता दलाचे राज्यसभा खासदार सुजित कुमार यांना 8 मे रोजी एक ई मेल पाठवण्यात आला आहे. त्यात तैवानच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होऊ नका असं सांगण्यात आलं आहे. इतकंच नाही तर या मेलमध्ये हे देखील सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चीनकडून कशाप्रकारे सर्वाधिक मदत पुरवली जात आहे. (China attempt to put pressure on Rajya Sabha MP Sujit Kumar)
आपल्या कूटनितीचा वापर करत दबाव निर्माण करण्यासाठी चीनकडून ई मेल पाठवण्यात आला आहे. या ई मेलमध्ये दूतावासाकडून ससंदेशी संबंधित प्रकरणाचे काऊन्सिलरने इशारा देताना हे ही म्हटलंय की, वन चायना पॉलिसीचं पालन भारतानेही करावं.
चीनच्या दूतावासाने भारतीय खासदाराला पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे की, “आम्हाला माहिती मिळाली आहे की तुम्ही FORMOSA CLUB च्या फाऊंडिंग सेरेमनीमध्ये भाग घेतला होता. हे पाऊल चिनी पॉलिसीचं पालन करणाऱ्या भारताच्या वचनाच्या विपरीत होतं. चीन क्रॉस स्ट्रेट्स रिलेशनच्या शांतिपूर्व विकासाला पुढे घेऊन जाणं सुरु ठेवेल. पण तैवानसोबत अतिकारिक पातळीवर कोणत्याही प्रकारच्या चर्चेला विरोध आहे”.
“चीन त्या देशांपैकी एक आहे, जो भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरुद्ध लढण्यात मदत करण्यासाठी सर्वात प्रथम मदत आणि समर्थन जाहीर करतो. त्याचबरोबर वेगाने अॅक्शनही घेणारा देश आहे. आतापर्यंत चीनने भारताला सर्वाधिक ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स आणि अन्य उपयोगी वस्तू पुरवल्या आहेत. चीन पुढेली भारताला अशाप्रकारे मदत पोहोचवेल. आपणाला आग्रह आहे की, तुम्ही FORMOSA CLUB मधून स्वत: नाव परत घ्यावं. जेणेकरुन भारत आणि चीनमधील महत्वपूर्ण संबंधांना बाधा येणार नाही आणि पुढेही एकमेकांना अशाप्रकारे मदत पुरवतील”.
यापूर्वी तैवानबाबत भारतीय माध्यमांनी केलेल्या सकारात्मक वार्तांकनावरुन चीनने देशातील जवळपास सर्व माध्यम संस्थांना धमकावण्याचं काम केलं होतं. चीनया या वागणुकीवर त्यांच्यावर जागतिक पातळीवरुन मोठी टीकाही झाली होती. मात्र त्यातून धडा घ्यायचा सोडून आता चीनने थेट भारतीय खासदारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यसभा खासदार सुजित कुमार यांनी तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला होता. तैवान सरकारने त्या बैठकीला FORMOSA CLUB असं नाव दिलं होतं. त्यात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. दरम्यान, तैवानबाबत चीनकडून येणारी अशा प्रकारची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. मात्र, चीनला याबाबत कुठलीही आपत्ती असेल तर त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी याबाबत चर्चा करायला हवी होती. त्यांनी थेट खासदारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करायला नको होता, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
इतर बातम्या :
कोरोना संसर्ग हे चीनचं जैविक हत्यार?; सीक्रेट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेचा दावा
वादळी वाऱ्याने चीनच्या प्रसिद्ध Glass bridge चं नुकसान, पर्यटक 330 फुटांवर लटकतानाचा फोटो
China attempt to put pressure on Rajya Sabha MP Sujit Kumar