नवी दिल्ली: आयसीएसई बोर्डाच्या (ICSE Results) इयत्ता दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यानंतर आता इयत्ता 12वीचा रिझल्ट देखील लागला आहे(CISCE Board Result 2022). यंदा देखील नेहमी प्रमाणेच मुलींनी या निकालात बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेत 99.38 % विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुली अव्वल स्थानी आहेत. CISCE ने जाहीर केलेल्या ISC परीक्षा 2022 मध्ये यावर्षी 99.38 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण चांगले आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 99.52 तर 99.26% मुले ISC परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत. 18 विद्यार्थ्यांनी या परिक्षेत टॉप केले आहे. ISC बोर्ड परीक्षा 2022 मध्ये एकूण 18 विद्यार्थ्यांनी 99.75 टक्केवारीसह पहिला क्रमांक मिळवला आहे.
CISCE बोर्डाचे दहावीच्या परीक्षेत यूपीचे तीन विद्यार्थी, कानपूर येथील अनिका गुप्ता, बलरामपूर येथील पुष्कर त्रिपाठी आणि सीएमएस, लखनऊ येथील कनिष्क मित्तल यांनी ICSE परीक्षेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. यांना 99.8% गुण मिळाले आहेत. याशिवाय हरगुन कौर मथारू ही पुण्याच्या सेंट मेरी स्कूलमधून पहिली आली आहे.
ICSE 10वी निकालात 99.97% इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 10वीच्या परीक्षेत एकूण 2,31,063 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 99.97% टक्के विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. यंदा 99.98% टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून 99.97% टक्के मुल उत्तीर्ण झाली आहेत.
यंदा सर्वच परीक्षांवर कोरोना महामारीचे सावट होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बोर्डानं ISCE आणि ISC च्या दोन्ही परीक्षा रद्द केल्या होत्या. मात्र विशेष मूल्यांकन पद्धतीनं ISCE आणि ISC बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल (ICSE, ISC Result 2021) जाहीर करण्यात आला आहे. यात मुलींनीच बाजी मारली आहे.
आयसीएसई बोर्डाच्या इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल पाहण्यासाठी results.cisce.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
त्यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
यावेळी INDEX NO आणि UID नंबर मागितला जाईल. तो त्यात नमूद करा.
त्यानंतर तुमच्या स्क्रिनवर निकाल दिसू लागेल
ICSE Result Notice Link
आयएससीची परीक्षा यंदा 6 एप्रिल ते 13 जून रोजी आयोजित केली. CISCE ने ISC, इयत्ता बारावीची परीक्षा दोन सेमिस्टरमध्ये आयोजित केली होती. पहिला सेमिस्टर नोव्हेंबर- डिसेंबर 2021मध्ये पार पडला. दुसरा सेमिस्टर एप्रिल-मे आयोजित करण्यात आला होता. एसएमसएसद्वारेही विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. एसएमएसद्वारे निकाल पाहण्यासाठी यूनिक आयडी टाईप करायचा. उदा: ISC 1234567, त्यानंतर हा मेसेज 09248082883 या नंबरवर पाठवा. निकाल कळेल.