जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir)वाढत्या दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी ऑपरेशन व्हॅली सुरू केले आहे. अनंतनागमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Clashes between security forces and terrorists) उडाली. अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर अजूनही कारवाई सुरू असल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले आहे. तर परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचेही सांगितले आहे. दरम्यान दिवसांपूर्वी पुलवामा येथे एका दहशतवाद्याचा (Terrorist) खात्मा करण्यात आला होता. त्राल भागातील मगहमा येथे ही चकमक झाली होती. तर दुसरीकडे, बडगाम जिल्ह्यात सीआरपीएफ पार्टीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता.
#AnantnagEncounterUpdate: 02 #terrorists killed. #Incriminating materials including arms & #ammunition recovered. Search going on. Further details shall follow.@JmuKmrPolice https://t.co/E1zUQeOB9T
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) May 28, 2022
काश्मीर झोन पोलिसांनी माहिती दिली की, अनंतनागच्या बिजबेहारा भागातील शितीपोरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर परिसराची नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली. आतापर्यंत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. तसेच दहशतवाद्यांच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचेही सांगितले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी पुन्हा एकदा काश्मीरमधील सर्वसामान्यांना लक्ष्य करत आहेत. काश्मिरी पंडित राहुल भट यांच्यानंतर अलीकडेच दहशतवाद्यांनी बडगाममध्ये टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची गोळ्या घालून हत्या केली होती.