या कारणाने अमरनाथ यात्रा रोखली, उत्तराखंडमध्ये काय झाली गडबड

| Updated on: Jul 07, 2023 | 1:24 PM

श्री अमरनाथ यात्रेला जूनमध्ये सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत 84 हजार यात्रेकरुंनी पवित्र गुफेतील बाबा बर्फानींचे दर्शन घेतले आहे.

या कारणाने अमरनाथ यात्रा रोखली, उत्तराखंडमध्ये काय झाली गडबड
AMARNATH_YATRA
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : पवित्र अमरनाथ यात्रेला प्रारंभ या जूनपासून झाला असला तरी आता या यात्रेला ब्रेक लावण्यात आला आहे. अमरनाथ यात्रा ( Amarnath Yatra ) ही अत्यंत खडतर मानली जाते. या यात्रेसाठी यंदा खूप मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. या यात्रेत सहभाग घेण्यासाठी यंदा कठोर नियम लावण्यात आले आहेत. आता या यात्रेला अचानक थांबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवर अमरनाथ यात्रेला थांबविण्यात आले असून यात्रेकरुना शिबिरात  थांबविण्यात आले आहे.

अमरनाथ यात्रा प्रारंभ होऊन जवळपास महिना उलटला आहे. या यात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या यात्रेसाठी देशातील हजारो श्रद्धाळू वर्षभर वाट पहात असतात. पवित्र गुफेतील बाबा बर्फानींचे दर्शन घेतले की आयुष्याचे सार्थक झाले असे म्हटले जाते. जम्मू – कश्मीरमधील दहशतवाद आणि प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीवर मात करीत दरवर्षी लाखो श्रद्धाळू या यात्रेसाठी नोंदणी करीत असतात. आतापर्यंत 84 हजार श्रद्धाळूंनी श्री अमरनाथ यात्रेत सहभाग घेत बाबा बर्फानींचे दर्शन घेतले आहे.

या राज्यांना पावसाचा अलर्ट

देशातील बहुतांशी राज्यात मान्सूनने दखल दिली आहे. देशभरातील विविध राज्यात मान्सूनचे रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. याच दरम्यान उत्तराखंड राज्याच्या पिथौरागड जिल्ह्यातील धारचूला तहसीलच्या दारमा घाटीत काल ढगफूटी झाली आहे. या अतिवृष्टीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हवामान अत्यंत प्रतिकूल बनले आहे. ढगफूटीमुळे आजूबाजूच्या गावाशी संपर्क तुटला असून गावात अनेक लोक अडकले आहेत. खराब हवामानाने बालटाल आणि पहलगाम जिल्ह्यातील दोन्ही मार्गावरील अमरनाथ यात्रा थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात्रेकरुना सुरक्षित शिबिरात पुढील आदेश मिळेपर्यंत थांबविण्यात आले आहे.

84 हजार यात्रेकरुंनी घेतले दर्शन

जम्मूतील बिघडलेल्या हवामानामुळे शुक्रवारी श्री अमरनाथ यात्रेला पुढील आदेश मिळेपर्यंच रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालत जाणाऱ्या यात्रेकरुना रामबनच्या चंद्रकोटमध्ये रोखण्यात आले आहे. यात्रेला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत 84 हजार यात्रेकरुंनी पवित्र गुफेतील बाबा बर्फानींचे दर्शन घेतले आहे.

स्कायमेटचा अंदाज

स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेच्या अंदाजानूसार येत्या 24 तासांत केरळचा किनारपट्टी, कोकण, गुजरात आणि गोवामध्ये पावसाचे प्रमाण वाढणार आहे. तर मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसममध्ये पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम आणि काही ठीकाणांवर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.