नवी दिल्ली: देशभरात गैरभाजपा (bjp) शासित राज्यांमध्ये तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्याने विरोधी पक्षांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (cm mamata banerjee) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यासह गैरभाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे भाजपविरोधात एकत्र या, असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी या पत्रातून केलं आहे. देशात सूडाचं राजकारण सुरू आहे. त्यानुसार ईडी, सीबीआय, आयबी, इन्कम टॅक्ससह विविध यंत्रणांचा राजकीय वापरासाठी चुकीचा वापर होत आहे, असं सांगत या प्रकारावर ममता बॅनर्जी यांनी चिंताही व्यक्त केली आहे. तसेच या मुद्द्यावर विरोधी पक्षांची एक बैठक होण्याची गरज आहे. या बैठकीतल पुढील वाटचाल आणि रणनीतीवर चर्चा केली गेली पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचे संकेत मिळताना दिसत आहेत.
ममता बॅनर्जी यांनी 27 मार्च रोजी हे पत्रं लिहिलं आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने आज हे पत्रं मीडियासमोर आणलं. या पत्रातून तपास यंत्रणाचा होणाऱ्या गैरवापरावर चिंता व्यक्त करतानाच हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. भाजपच्या हुकूमशाही सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. त्यामुळे या मुद्द्यावर लवकरच एक बैठक बोलवून त्यात पुढील रणनीती आखली पाहिजे, असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही पत्रं लिहिलं आहे. पवारांनीही ममता बॅनर्जी यांचं पत्रं मिळाल्याचं स्पष्ट केलं आहे. या पत्रानंतर आम्ही लवकरच एक बैठक घेणार आहोत. ही बैठक दिल्ली किंवा मुंबई दोन्हीपैकी एका ठिकाणी होईल. बैठकीची तारीख अजून निश्चित नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
कोळसा घोटाळा आणि पशू तस्करी प्रकरणात ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची सीबीआय आणि ईडीने चौकशी केली आहे. त्यामुळे ममतादीदींच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्रातही गैर भाजप पक्षातील नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
WB CM-TMC chief Mamata Banerjee writes to all Oppn leaders & CMs, “expressing concern over BJP’s direct attacks on democracy”
‘I urge that all of us come together for a meeting to deliberate on the way forward at a place as per everyone’s convenience & suitability,’ letter reads pic.twitter.com/OvlV2W4yo6
— ANI (@ANI) March 29, 2022
संबंधित बातम्या:
VIDEO: पवारांनी काय केलं ते सोडा, सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली?; अमोल मिटकरींची खोचक टीका