नवी दिल्लीः बिहारच्या राजकारणात तीव्र वेगाने विविध घटना घडामोडी घडत असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर (Loksabha Election 2024) आणि राजकीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करण्यासाठी ते सध्या दिल्ली दौऱ्यावर असल्याचे सांगण्याय येत आहे. त्यांच्यासोबत सध्या संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह आणि बिहार मंत्रिमंडळातील मंत्री अशोक चौधरीही त्यांच्या दौऱ्यात आहेत. नितीश कुमारांनी सोमवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबरोबरच चर्चा करुन मंगळवारी अपक्ष पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. या अपक्ष पक्षातील नेत्यांची भेट घेताना त्यांनी डाव्या पक्षातील वरिष्ठ नेते सीताराम येचुरींचीही भेट (Sitaram Yechury) घेत त्यांनी सांगितले की, अपक्ष जर एकत्र आले तर मात्र भारतीय राजकारणात मोठा फरक पडणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
सीताराम येचुरींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, देशातील सर्व डावे पक्ष, काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष जर एकत्र आले तर मात्र भारतीय राजकारणात मोठा फरक पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबद्दल बोलताना ते म्हणाले की, सध्या मी तरी पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, आणि त्यासाठी कोणीही दावेदारही नाही, त्यामुळे सध्या राजकारणातील अपक्षांची मोट बांधण्याचे काम चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर नितीश कुमार यांच्या भेटीबद्दल सीताराम येचुरी यांनी बोलताना सांगितले की, नितीश कुमारांनी सांगितल्या प्रमाणे धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज ज्या प्रकारे देशातील लोकशाहीवर हल्ले केले जात आहेत, ते जर रोखायचे असतील तर विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, त्याचबरोबर पंतप्रधान पदाचा दावेदार कोण याविषयी मात्र वेळ येईल तेव्हाच ते चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी सांगितले.
नितीश कुमार यांच्या भेटीगाठीने भारतीय राजकारणातील विविध चर्चेला उधान आले असतानाच नितीश कुमार आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरही संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर डी राजा यांच्यासोबतही चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासोबतही चर्चा करणार आहेत. देशातील विरोधी गटातील पक्षांना एकत्र आणण्यासाठी आणि भाजविरोधात लढण्यासाठी अपक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न नितीश कुमार करत असल्याचेही दिसून येत आहे. या दौऱ्याप्रसंगी त्यांनी आपण पंतप्रधान पदाचा दावेदारही नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून विरोध पक्षांची मोट बांधण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
दिल्ली दौऱ्यावर असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देशातील अनेक बड्या नेत्यांची भेट घेणार आहेत. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हरियाणातील बडे प्रस्त असलेले ओम प्रकाश चौटाला, मुलायम सिंह यादव, त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांच्यासोबतही ते चर्चा करणार असून राजकारणाची पुढील दिशा ठरवणार आहेत. नितीश कुमार दौऱ्यावर असतानाच जेडीयू आणि आरजेडीकडून मात्र नितीश कुमार हेच पंतप्रधान पदाचे मुख्य दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे.