BJP MLA : एकटीच ये भेटायला, नग्न फोटो पाठव, आमदाराच्या विकृत मागणीमुळे तरुणीचा संताप; विधानसभेपूर्वीच अडचणीत भाजपा

| Updated on: Aug 20, 2024 | 9:17 AM

उत्तर भारतात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जम्मू आणि काश्मीर, हरियाणात निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच शेजारच्या राज्यात भाजपची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. एका आमदारावरील गंभीर आरोपांमुळे भाजप अडचणीत आली आहे.

BJP MLA : एकटीच ये भेटायला, नग्न फोटो पाठव, आमदाराच्या विकृत मागणीमुळे तरुणीचा संताप; विधानसभेपूर्वीच अडचणीत भाजपा
भाजप आमदाराविरोधात गंभीर आरोप
Follow us on

हरियाणात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. तर त्याला लागूनच असलेल्या हिमाचल प्रदेशात भाजपची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. हिमाचल प्रदेशातील चुराह विधानसभेचा भाजप आमदार आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष हंस राज यांच्यावरील आरोपामुळे पक्ष अडचणीत आला आहे. त्यांच्याविरोधात चंबा जिल्ह्यात पोलिसांनी लैगिंक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. एका 20 वर्षीय तरुणीला त्यांनी ॲप पाठवला. तिचे नग्न छायाचित्र पाठवण्याची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. या तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 9 ऑगस्ट रोजी गुन्ह्याची नोंद केली. पण आता हे प्रकरण समोर आले आहे.

तरुणीचे आरोप काय?

तरुणीचे वडील भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांनी पक्षाच्या आमदारावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार हंस राज यांनी ऑनलाईन चॅटिंग दरम्यान मुलीला नग्न फोटो मागितले. तिला अश्लील मॅसेज केले. तरुणी काही कामाच्या निमित्ताने आमदाराच्या संपर्कात आली. ती जेव्हा पण या कामाविषयी त्यांच्याशी चर्चा करायची, तेव्हा आमदार तिला वैयक्तिक भेटण्यासाठी आणि आपण सांगू तसं वागण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर आमदार आणि त्याच्या समर्थकांनी व्हॉटसॲपवरील चॅट डिलिट करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप पण पीडित तरुणीने केला आहे.

हे सुद्धा वाचा

समर्थकांनी फोनच तोडला

TOI च्या वृत्तानुसार, चॅट आणि इतर पुरावे नष्ट करण्यासाठी ते वारंवार धमक्या देत आहेत. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपल्या जीवाला अथवा कुटुंबाला कोणत्याही प्रकारची हानी झाली तर त्याला आमदार आणि त्याचे समर्थक जबाबदार असतील, असे या तरुणीने म्हटले आहे. तरुणीकडे दोन स्मार्टफोन होते. त्यातील एक फोन या आमदाराच्या समर्थकांनी तोडला. पोलिसांनी या प्रकरणात पीडितेची तक्रार दाखल करुन गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अभिषेक यादव यांनी दिली. या गुन्ह्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. भाजप विरोधी राज्यात महिला अत्याचाराप्रकरणात आक्रमक भाजप, या प्रकरणात पक्षातीलच एका पदाधिकाऱ्याच्या मुलीला साथ द्यायचे सोडून दबाव टाकत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.