मुंबई : मोबाईलवरती (Mobile) रोज असंख्य व्हिडीओ (Viral Video) फिरत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. विविध घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात. त्यामध्ये काही चांगले व्हिडीओ असतात, काही विचित्र व्हिडीओ असतात. काल एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कंडक्टरने प्रवाशाला चालत्या बसमधून बाहेर फेकले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सध्या अनेकांच्या मोबाईलमध्ये व्हायरल होत असलेला व्हिडीओ तामिळनाडू राज्यातील आहे. तसेच तिरुवन्नामलाई या भागात ही घटना घडली आहे. बसमधील मागच्या बाजूच्या दरवाज्यामध्ये कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात कायतरी बोलणं सुरु आहे. त्यानंतर कंडक्टर त्या प्रवाशाला उतरण्यास सांगत आहे. ज्यावेळी तो प्रवासी तिथचं पायरीवर उभा राहतो. त्यावेळी कंडक्टर त्याला धक्का मारतो. त्यानंतर बस निघून जाते असं स्पष्ट व्हिडीओत दिसत आहे.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. प्रवासी दारु पिला असल्यामुळे इतर प्रवाश्यांना त्रास देत होता. त्यामुळे त्याला खाली उतरल्याचे कंटक्टरने सांगितले आहे. या प्रकरणाची अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून त्याची चौकशी होणार आहे.
#government #TamilNadu #TamilnaduNews #bus #conductor pic.twitter.com/rGI9BMv1Rv
— MAHES ARUN AMD (@mahes_arun_amd) November 19, 2022
सोशल मीडियावर अनेकांनी ही बाब चुकीची असल्याचं म्हटलं आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु असून कंडक्टरवरती कारवाई होण्याची शक्यता आहे.