नवी दिल्ली: पबमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल (Party Video Viral) झाल्यानंतर काँग्रेसकडून त्यांचा बचाव करण्यात आला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे की, आतापर्यंत देशात पार्टी करणे हे कायदेशीर असून त्यामध्ये गैर असे काहीच नाही. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी प्रकाश जावडेकर यांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते हातात शॅम्पेन घेऊन उभे आहेत.
Who is this ? ? pic.twitter.com/dVuiiHGpEL
— Manickam Tagore .B??✋மாணிக்கம் தாகூர்.ப (@manickamtagore) May 3, 2022
रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल म्हणाले की, राहुल गांधींचा एक मित्र परदेशात गेला आहे. एका पत्रकार मित्राच्या लग्न समारंभाला नेपाळला गेले होते. यावेळी त्या विवाहसमारंभाला उपस्थित राहणे हा काही गुन्हा नाही. राहुल गांधींच्या या भेटीनंतर आता मित्राकडे जाणे किंवा लग्नाला जाणे हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर हे आता भाजप ठरवणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधींच्या पबमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्यावर निशाणा साधत ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, सुट्टी, पार्टी, हॉलिडे, प्लेजर ट्रिप, प्रायव्हेट फॉरेन व्हिजिट यामुळे देशातील इतर गोष्टी आता समस्या राहिल्या नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे.
तर भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींच्या वैयक्तिक आयुष्याशी त्याचा काहीही संबंध नाही. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे, पण काँग्रेसप्रशासित राजस्थान हिंसाचाराच्या आगीत जळत असताना ते परदेशात जाताना दिसतात. तर त्यांनी यावेळी राज्याची काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले आहे.