नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडीकडे काँग्रेस कार्यकर्ते, नेत्यांप्रमाणेच अनेकांच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत. काँग्रेसचा पुढील अध्यक्ष (Congress President Election 2022) कोण होणार याचा अंतिम निर्णय आज रविवारी होणार असल्याचे सागंण्यात येत आहे. रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यामध्ये पक्षाध्यक्ष निवडीबाबत कार्यक्रमाला मंजुरी दिली जाणार आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) अध्यक्षपदाची सूत्रे घेणार की काँग्रेसची कमान (Congress President) दुसऱ्या कोणाच्या हाती देणार यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधींची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात असून राहुल गांधी यांचे मन वळवण्यासाठी निवडणूकही तूर्तास पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसकच्या या ऑनलाइन बैठकीत अध्यक्ष निवडीच्या सविस्तर कार्यक्रमाला मंजुरी देण्याबरोबरच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरच शिक्का मोर्तब होण्याची शक्यताही आहे.
गुलाम नबी आझाद यांनी दिलेला राजीनामा हा विषयही यावेळी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेस निवडीबाबत गंभीर वक्तव्य करत त्यांनी आझाद यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर ‘अपरिपक्व आणि बालिश’पणाचा आरोपही केला होता. त्यानंतर त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत काँग्रेसने त्यांच्यावर पलटवार केला होता आणि त्यांचा ‘डीन मोदी-मे’ झाला असल्याचेही म्हटले होते.
सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात असतानाच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र सोनिया गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही बरोबर गेले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या ऑनलाईन बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेस कार्यकारिणीच्या ऑनलाइन बैठकीत हे तीन प्रमुख नेते सहभागी होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसच्या या तीन व्यक्ती आता नसल्याने काँग्रेसच्या बैठकीला काही आठवडे उशीर होऊन आणि ऑक्टोबरमध्येच पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस सध्या ‘भारत जोडो यात्रे’ची तयारी करत आहे. या प्रवासादरम्यान दक्षिणेकडील कन्याकुमारी ते उत्तरेकडील काश्मीर असे 3570 किमीचे अंतर पाच महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. ही 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच विविध राज्यांमध्ये छोट्या प्रमाणात ‘भारत जोडो यात्रा’ काढण्यात येणार आहे.
काँग्रेस कार्यकारिणीची 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती मात्र गेल्या वर्षी काँग्रेस कार्यकारिणीने मंजूर केलेल्या वेळापत्रकानुसार, काँग्रेस अध्यक्ष निवडीची प्रक्रिया 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काँग्रेसच्या गेल्या वर्षीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता की ब्लॉक समित्यांच्या निवडणुका 16 एप्रिल ते 31 मे, जिल्हा समित्यांच्या अध्यक्षांच्या निवडणुका 1 जून ते 20 जुलै या कालावधीत, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यांच्या निवडणुका घेतल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले होते. काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक नेते जाहीरपणे राहुल गांधींना पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे आवाहन करत आहेत, तरीही या मुद्यावर अजून अंतिम निर्णय झाला नाही. पक्षाच्या काही नेत्यांकडून राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाहीत असं सांगितले जात आहे तर गेहलोत यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार राहुल गांधी असल्याचे सांगत शेवटच्या क्षणापर्यंत राहुल गांधींना पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर गेहलोत यांनी हे स्पष्ट केले आहे. बैठकीनंतर गेहलोत यांना पक्षाध्यक्ष करण्याबाबत चर्चा झाली असती, अशी चर्चा सुरू झाली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणूनच त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आहेत.