मुंबईः सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर सीमावादाची नव्याने ठिणगी पडली. त्यानंतर दोन्ही राज्यातून असंतोष व्यक्त करण्यात येऊ लागला. वाद वाढल्याने सीमावादात केंद्रानं हस्तक्षेप करावा अशीही मागणी करण्यात येऊ लागली. हा वाद आणखी पेटू लागल्याने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात राज्यातून जोरदार टीका होऊ लागली. त्यात आता काँग्रेसनेही उडी घेत भाजपवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी या प्रश्नावर बोलताना त्यांनी थेट भाजपवर टीका केली आहे. यावर बोलताना म्हणाले की, महारष्ट्रातील खासदारांनी यापूर्वीच केंद्राकडे भेटण्यासाठी वेळ मागितली होती.
मात्र ज्या पद्धतीने सीमावाद ज्या पद्धतीने पेटवला गेला ते मात्र अत्यंत चुकीचं असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.
तर कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने या प्रकरणावर ज्या प्रकारे बोलत आहेत, तेही चुकीचं असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र-कर्नाटक या वादावर बोलताना काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्याकडून नेहमी वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत.
त्यामुळे बोमई हे त्यांच्याच पक्षात आहेत. त्यामुळे त्यांना समजून सांगणं आणि मध्यस्थी करणं गरजेचं असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेत असंतोष पसरत आहे.
त्याचवेळी बाळासाहेब थोरात यांनी गुजरात निवडणुकीविषयीही सांगितले. यावेळी गुजरात निवडणुकीचे विश्लेषण करताना म्हणाले की, भाजपच्या विजयात आपचा वाटा मोठा आहे.
त्यांचा फटका काँग्रेसला बसला आहे. विरोधी पक्ष म्हणून एकत्र येणे काळाची गरज आहे पण ते समजून घेणंही गरजेचं असल्याचेही त्यांनी सांगितले.
ईडीच्या कारवाईवर बोलताना त्यांनी भाजपची पोलखोलही केली. ईडीकडून नेत्यांवर केली गेलेली कारवाईबाबत सांगितले की, लहान मुलांना जरी विचारलं तरी ईडीचं राजकारण त्यांच्या लक्षात आले आहे, ईडीसारख्या संस्थांचा राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा ठपका त्यांनी भाजपवर ठेवला आहे.
भाजप मंत्री आणि पदाधिकारी यांचं वागणं बोलणं अत्यंत चुकीचं आहे. संजय राउताना भाजपचे लोक पुन्हा आत घालायला निघाले आहेत का.? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.