बकरीद में बचेंगे, तो मोहर्रम पर नाचेंगे, असं का म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे?

| Updated on: Oct 12, 2022 | 5:04 PM

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी ब्लॉक अध्यक्ष म्हणून निवड केलेला एक सामान्य कार्यकर्ता आज काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे हे काही कमी नाही असं खर्गे सांगतात.

बकरीद में बचेंगे, तो मोहर्रम पर नाचेंगे, असं का म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे?
Follow us on

नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक (Congress President Election 2022) जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. राजा भोज विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडूनही त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjin Kharge) भोपाळमधील काँग्रेस नेत्यांना भेटल्यानंतर त्यांनी आपल्याच बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले.

मध्य प्रदेशाच्या दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांनी खर्गे यांना प्रश्न् विचारला की, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार आहे? त्यावर बोलताना ते म्हणाले की, आधी ही पक्षांतर्गत असलेल्या निवडणूक निकाल लागू दे.

त्यानंतर त्याविषयी बोलताना त्यांनी म्हणीचा संदर्भ देत म्हणाले की, म्हणाले बकरीद में बचेंगे, तो मोहर्रम पर नाचेंगे अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाची 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी लोकसभा खासदार शशी थरूर आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे तयारी करत आहेत.

दोन्हीही नेते सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन काँग्रेस नेत्यांना आपल्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.

काँग्रेस नेत्यांच्या भेटीनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी मला वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीचा सल्ला दिला आहे.

त्यामुळे वरिष्ठ नेत्यांचा सल्ला मानूनच मी या अध्यक्ष पदासाठी उमेदवारी माझी जाहीर केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष पदाची ही निवडणूक असली तरी ही आमच्या घरातील निवडणूक असल्याचेही त्यांनी सांगितले. हे सांगताना त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आठवण करुन सांगितले की, काँग्रेस पक्षात मला इंदिरा गांधी यांनीच मला पहिले पद दिले होते.

त्यामुळे काँग्रेसच्या वाढीसाठी त्याकाळापासून मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आणि आज मी अध्यक्षपदासाठी रिंगणात असल्याचेही त्यांनी सांगितले.