नवी दिल्ली : महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीवर काँग्रेस उद्या केंद्रसरकारविरोधात हल्लाबोल करणाराय. दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला या प्रदर्शनाला परवानगी नाकारली. तरीही काँग्रेसनं प्रदर्शनाची तयारी सुरू केलीय. प्रदर्शन करणाऱ्यांवर दिल्ली पोलीस कारवाई करणार असल्याची भीती काँग्रेसच्या नेत्यांना आहे. त्यामुळं आजच रात्री काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस मुख्यालयात (Congress Headquarters) थांबलेत. काँग्रेसच्या निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, खासदार उद्या सकाळी 11 वाजता संसद भवनातून विजय चौकापर्यंत मोर्चा काढतील. काँग्रेस नेते उद्या राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांचं निवासस्थानाला (Prime Minister’s Residence) घेराव करण्याची योजना बनवत असल्याची माहिती आहे. काँग्रेसनं उद्या विरोध प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी चलो संसद, चलो राष्ट्रपती भवनचा (Rashtrapati Bhavan) नारा दिला.
संसदेचं कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी काही भागात कलम 144 लागू करण्यात आलंय. दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या प्रदर्शनाला परवानगी नाकारली आहे. जनतेशी संबंधित मुद्यांवर कार्यक्रम करणार, असल्याचं काँग्रेसनं पोलिसांना ठणकावून सांगितलं. दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दल काँग्रेस मुख्यालयाला छावणीत रुपांतरित करतील, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना आहे. खासदारांना विजय चौकातच थांबविलं जाईल. या भीतीपोटी आज रात्रीचं कार्यकर्त्यांना काँग्रेस मुख्यालयात बोलावण्यात आलंय. कार्यकर्त्यांना रात्री झोपण्यासाठी तंबू आणि कुलरची व्यवस्था करण्यात आली. गाद्या, बेड, चादर, पंख्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री कार्यकर्त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली.
दिल्ली पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी परवानगी नाकारली. परंतु, जनतेसाठी आवाज उठविणार असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय. या प्रदर्शनात राहुल गांधी, प्रियंका गांधीही सहभागी होणार आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात तसेच शहराच्या ठिकाणी प्रदर्शन केलं जाणार आहे. गांधी कुटुंबीयांच्या ईडी चौकशीच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करत असल्याचा भाजपचा आरोप आहे. परंतु, जनतेसाठी महागाई, बेरोजगारी, जीएसटी असे मुद्दे घेऊन उद्या काँग्रेस प्रदर्शन करणार आहे.
5 ऑगस्ट 2019 ला मोदी सरकारनं काश्मीरमधून कलम 370 हटविलं. 5 ऑगस्ट 2020 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिराचं भूमिपूजन केलं. त्यामुळं काँग्रेसनं 5 ऑगस्टलाचं आंदोलन करण्याचा निश्चय केला असावा.