एकही कार नावावर नाही पण इतक्या करोडो रूपयांची संपत्ती, सोनिया गांधींच्या प्रतिज्ञापत्रात काय?

| Updated on: Feb 15, 2024 | 9:10 PM

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा निया गांधी यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आपली संपत्ती जाहीर केली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार सोनिया गांधी यांच्या नावावर एकही गाडी नसून त्यांच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीचा आकडाही त्यामध्ये देण्यात आला आहे.

एकही कार नावावर नाही पण इतक्या करोडो रूपयांची संपत्ती, सोनिया गांधींच्या प्रतिज्ञापत्रात काय?
soniya gandhi
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीऐवजी राज्यसभेचा पर्याय निवडला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोनिया गांधी रायबरेली मतदार संघातून निवडणूक लढवणार नाहीत. सोनिया गांधी यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आपली संपत्ती जाहीर केली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार सोनिया गांधी यांच्या नावावर एकही गाडी नाही. सोनिया गांधी यांच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीचा आकडा ऐकल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही.

किती आहे सोनिया गांधींची एकूण संपत्ती?

2019 मध्ये सोनिया गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती 11.81 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. सोनिया गांधी यांच्या संपत्तीमध्ये मागील वर्षांच्य तुलनेमध्ये 72 लाखांचा वाढ झालेली आहे. सोनिया गांधी यांची इटलीतील लुईझियाना येथे मालमत्ता आहे. वडिलांच्या संपत्तीतही त्यांनी आपला हिस्सा आपल्याला मिळाल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. त्यांच्याकडे एकूण 12.53 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

सोनिया गांधींकडे 88 किलो चांदी तर 1267 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी माझ्याकडे टुव्हिलर किंवा कार नसल्याचे सांगितले होते. सोनिया गांधी यांचे पेंग्विन बुक इंडिया, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, आनंदा पब्लिशर्स आणि कॉन्टिनेंटल पब्लिकेशन्स यांच्याशी करार आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून 1.69 लाख रुपयांची रॉयल्टी मिळाल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.

दरम्यान, सोनिया गांधी यांच्याविरोधातील प्रलंबित खटल्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुरू असलेल्या खटल्याशिवाय, राज्यसभा माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी असोसिएटेड जर्नल्स प्रकरणात दाखल केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणाव्यतिरिक्त, आणखी एका प्रकरणात आयपीसीच्या कलम 120B, 420, 403 अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. .