नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक (Congress President Eelcation 2022) बहुचर्चित झाली आहे. या निवडणुकीकडे ज्या प्रमाणे काँग्रेसने लक्ष घातले आहे, त्याच प्रमाणे भाजपनेही लक्ष ठेवले आहे. ही चर्चा चालू असतानाच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) मात्र काँग्रेस अध्यक्षपद मिळण्यापूर्वीच मुख्यमंत्री पदाचा ते राजीनामा देणार आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाबरोबरच राजस्थान सीएम पदाचाही फैसला आजच होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस अध्यक्ष पद आणि राजस्थान मुख्यमंत्री निवडीसाठी सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ट्विट केले आहे.
जयपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विधीमंडळ पक्षाची आज बैठक होणार असून, त्यावेळी नवीन मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबतही ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केली जाणार आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना अध्यक्ष पद मिळाल्यानंतर राजस्थानातील नेतृत्त्वात बदल होण्याची शक्यता असल्याने ही बैठक बोलवली गेली आहे.
काँग्रेससाठी ही बैठक महत्त्वाची असल्याने अनेक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला पक्षाचे सरचिटणीस आणि राजस्थान प्रभारी अजय माकन आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अशोक गेहलोत यांना काँग्रेस अध्यक्ष पद मिळाल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री पद जाणार की राहणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वी एक व्यक्ती एक पद असं जाहीर केले होते. त्यामुळेही अशोक गेहलोत यांचे हे पद चर्चेत आले होते. काँग्रेस अध्यक्ष पदही आणि मुख्यमंत्री पदही आपणच राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.
त्यामुळे हे पद चर्चेत आले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी केरळमध्ये झालेल्या चिंतन शिबिरामध्येही एक व्यक्ती, एक पद हे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले होते.
काँग्रेस अध्यक्ष पदावर अशोक गेहलोत यांची निवड झाल्यानंतर मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री पद सोडावे लागणार असल्याची शक्यता होती.
मात्र आता गेहलोत यांच्यानंतर मुख्यमंत्री पद सचिन पायलच यांच्याकडे जाणार की, गेहलोत यांच्या जवळच्या माणसांचीच निवड केली जाणार हे मात्र आता निवडीनंतरच कळणार आहे.
त्यामुळे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत या विषयावर काय निर्णय होऊ शकतो असंही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
सध्याच्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची माकन यांनी भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, मुख्यमंत्रीपदासाठी ज्या सचिन पायलट यांचे नाव चर्चेत आहे.
त्यांनीच राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी आणि इतर आमदारांची भेट घेतली आहे. त्यामुळे सचिन पायलट हे राजस्थान मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार असले तरी सी. पी. जोशी यांच्याही नावाची चर्चा आहे.