नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress President Election 2022) होणाऱ्या निवडणुकीची जोरदार चर्चा रंगली होती. त्या निवडणुकीसाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीविषयी मत व्यक्त करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, खूप दिवसांपासून मी या दिवसाची वाट पाहत होते. या निवडणुका 22 वर्षांनी होत असून 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती पक्षाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) आणि मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यामध्ये ही निवडणूक होत आहे. या निवडणुकी थरूर यांना अनेक राज्यांमध्ये पोलिंग एजंटही सापडले नसल्याची जोरदार चर्चा होती.
त्यामुळे उत्तर भारतात या दोघाही नेत्यांची पकड नसल्याचे दिसून आले. थरुरांना पोलिंग एजंट मिळाला नाही तर दुसरीकडे खर्गे यांचा एकही कार्यकर्ता या निवडणुकीत सामील झाला नव्हता.
शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खर्गे हे दोघेही नेते दक्षिण भारतातून आहेत. त्यामुळेच थरुरांना पोलिंग एजंट मिळाला नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ज्यावेळी 2000 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. त्यावेळी जतीन प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती, त्यावेळी प्रसाद यांची थरुरांसारखी अवस्था झाली होती.
त्या निवडणुकीत सोनिया गांधींना एकतर्फी पाठिंबा मिळाला आणि त्याच पक्षाध्यक्ष म्हणून निवडून आल्या. दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये ही निवडणूक होत असली तरी गांधी घराण्याने मात्र कोणालाच जाहीर पाठिंबा दर्शविला नाही.
ही राजकीय परिस्थिती असतानाही थरुरांना पोलिंग एजंट का मिळाला नाही हा प्रश्न अनेक जण उपस्थित केला जात आहे.
काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी मतदान प्रक्रियेत बदल करण्यात आले आहे. पूर्वीच्या पद्धतीनुसार मतदारांना बॅलेट पेपरमध्ये ज्या उमेदवाराला मत द्यायचे आहे, त्या उमेदवाराच्या नावापुढे ‘1’ लिहायचे होते.
त्यावर शशी थरुर आणि त्यांच्या टीमन आक्षेप घेतला होता. या निवडणूक पद्धतीमुळे गोंधळ होऊ शकतो असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे ती प्रक्रिया बदलून काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांच्या टीमने, पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या अध्यक्षांसह, मतपत्रि टिक मार्क (✓) करण्यात यावी, असे सांगण्यात आले. त्यामुळे थरुर गटाची मागणी मान्य करुन नियम बदल केले गेले.
लोकप्रियतेच्या बाबतीत शशी थरूर प्रचंड पुढे आहेत खर्गे यांच्यापेक्षा ती कितीतरी जास्त आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरचे 8.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर खरगेचे 100.9k म्हणजे सुमारे एक लाख आहेत.
लोकप्रियतेच्या बाबतीत ही गोष्ट खरी असली तरी उत्तर भारतात मात्र थरुरांना पोलिंग एजंट मिळाला नाही हे वास्तव आहे.