नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Election) नुकत्याच पार पडल्या. या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला (Congress) दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेसनं यावेळी पंजाब सारखं राज्य हातातून गमावलं आहे. तर, गोवा आणि उत्तराखंडमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण असताना देखील पक्षाला यश आलेलं नाही. तर, उत्तर प्रदेशमध्ये पक्षाचे केवळ 2 आमदार निवडून आले आहेत. तर, मणिपूरमध्येही काँग्रेसला सत्ता मिळवता आलेली नाही. या पाच राज्यातील पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस वर्किंग कमिटीची नवी दिल्लीत बैठक पार पडली या बैठकींनंतर काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यांना राजीनामा द्यायला सांगितला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात ट्विट द्वारे माहिती दिली आहे. आता काँग्रेस पाच राज्यांच्या पराभवासंदर्भात आणखी कोणती पावलं उचलणार हे पाहावं लागणार आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर असल्याचं दिसून येतं आहे. पाच राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे घेण्याचा निर्णय झाला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संदर्भात सूचना केल्याची माहिती रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील प्रदेशाध्यक्ष राजीनामे देणार आहेत. यामध्ये पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू देखील राजीनामा देण्याची शक्यता आहे.
Congress President, Smt. Sonia Gandhi has asked the PCC Presidents of Uttar Pradesh, Uttarakhand, Punjab, Goa & Manipur to put in their resignations in order to facilitate reorganisation of PCC’s.
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 15, 2022
गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. गोव्यात काँग्रेसला 11 जागा मिळवता आल्या. काँग्रेसचे गेल्या विधानसभा निवडणुकीत 17 आमदार निवडून आले होते. मात्र, नंतरच्या काळात 15 आमदारांनी पक्ष सोडला. काँग्रेसला या निवडणुकीत 11 आमदार निवडून आणण्यात यशं आलंय. मात्र, सत्ता मिळवण्यात अपयश आलंय. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज दुपारीच राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी जी-23 मधील नेत्यांना घरी बोलावलं आहे. जी23 नेत्यांना उद्या रात्री जेवणाच निमंत्रण दिलं आहे. कपिल सिब्बल यांच्या घरी कोणकोण नेते जाणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या:
Cidco : सिडकोची नवी मुंबईकरांना होळी भेट, 6508 घरं विक्रीसाठी उपलब्ध करणार
IPL 2022: खबरदार! बायो बबल मोडल्यास बंदीपासून ते कोट्यवधीचा दंड, वाचा BCCI चे अद्दल घडवणारे नियम