National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे. त्याविरोधात काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्तेही नाराज झाले आहेत आणि ईडीच्या चौकशी विरोधात आंदोलने करत आहेत. अशा प्रकारची आंदोलने गेली चार दिवस देशाच्या विविध भागात करण्यात येत आहेत. असेच एक आंदोलन आज मंगळवारी दिल्लीतही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले. तसेच यावेळी निदर्शने केली. मात्र यावेळी एका काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनीही (Congress women activists) पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ समोर येत आहे. ज्यात ती महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर थुंकताना दिसत आहे. या नेत्या काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा नेट्टा डिसोझा आहेत. व्हिडिओमध्ये त्या पोलिसांच्या गाडीतून काही सुरक्षा कर्मचाऱ्यांवर थुंकताना (spit) स्पष्ट दिसत आहेत. त्यांचे हे कृत्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH | Mahila Congress President Netta D’Souza spits at police personnel during a protest with party workers in Delhi against ED for questioning Congress leader Rahul Gandhi in the National Herald case. pic.twitter.com/cPBIntJq1p
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) June 21, 2022
राजधानी दिल्लीतील नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून काँग्रेस नेत्यांची नाराजी थांबण्याचे नाव घेत नाही आहे. राहुल गांधींच्या चौकशीच्या विरोधात मंगळवारी दिल्लीतही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनीही पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. व्हिडिओमध्ये एक महिला कर्मचारी पोलिस कर्मचाऱ्यांवर थुंकताना दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
A propaganda is running against me on media. Here is the vedio to understand how I was hakled during that mud unwanted particles like hair some dust went into my mouth. Which I threw out of my mouth. I had no intention to disrespect our security personals. SATYAMEV JAYETE ! pic.twitter.com/NU6LmLijkY
— Netta D’Souza (@dnetta) June 21, 2022
त्यानंतर प्रकरण वाढत असल्याचे पाहून नेट्टा डिसोझा यांनी खुलासा केला. त्यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, त्यावेळी त्यांच्या तोंडात धूळ गेली होती, जी ती थुंकत होती. तसेच डिसोझा यांनी ट्विटरवर लिहिले की, मीडियामध्ये माझ्याविरोधात अपप्रचार सुरू आहे. त्या वेळी माझ्या तोंडात धूळ गेली जी मी तोंडातून बाहेर काढली. सुरक्षा कर्मचाऱ्यांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. सत्यमेव जयते!
तर यानंतर नेट्टा डिसूझा यांचा व्हिडिओ शेअर करताना भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी लिहिले की, लज्जास्पद आणि घृणास्पद. आसाममध्ये पोलिसांना मारहाण केल्यानंतर, हैदराबादवर तिची कॉलर धरून, आता महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा पोलीस आणि महिला सुरक्षा कर्मचार्यांवर थुंकतात कारण राहुलची भ्रष्टाचाराबाबत ईडीकडून चौकशी केली जात आहे. काय सोनिया, प्रियांका आणि राहुल यांच्यावर कारवाई करणार का?
सत्याग्रह कभी नहीं हारता, सत्य कभी नहीं झुकता !
महिला कांग्रेस अध्यक्ष सुश्री @dnetta को जबरन हिरासत में लेती मोदी जी की कठपुतली पुलिस ! pic.twitter.com/aMEha1D9NH
— All India Mahila Congress (@MahilaCongress) June 21, 2022
दुसरीकडे महिला काँग्रेसने नेट्टा डिसोझा यांच्यावर बळजबरी करण्यासाठी पोलिसांना जबाबदार धरले आहे. काँग्रेसने पोलिसांना भाजपची कठपुतलीही म्हटले आहे. ऑल इंडिया महिला काँग्रेसने व्हिडिओ ट्विट करून लिहिले, सत्याग्रह कधीही हार मानत नाही, सत्य कधीही झुकत नाही! मोदीजींच्या कठपुतळी पोलिसांनी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले!